Breaking News

*एनपीएच कार्ड धारकांना निःशुल्क धान्य वाटप करण्याची पंचायत समिती सदस्य राहुल तीवारी यांची मागणी* *उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना निवेदन*

*एनपीएच कार्ड धारकांना निःशुल्क धान्य वाटप करण्याची पंचायत समिती सदस्य राहुल तीवारी यांची मागणी*

*उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना निवेदन*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर ः कोरोना काळात केंद्र सरकारने में व जून महिन्याचे धान्य निःशुल्क वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

*या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने तूर्तास अंत्योदय कार्ड धारक अन्न सुरक्षा योजना योजने अंतर्गत में महिन्याचे धान्य तांदूळ आणि गहू निःशुल्क देण्याचे आदेश दिले आहेत मात्र वाटप करण्यात येत असलेल्या साखरेचे पैसे घेण्यात येत आहे असाही आरोप पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी यांनी केला आहे.

मागील वर्षाच्या कोरोना काळात ज्यांच्याकडे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अश्या सर्व सामान्य नागरिकांचे एनपीएच कार्ड तयार करण्यात आले मात्र ते आज पर्यंत ऑन लाईन करण्यात आले नाही त्यामूळे ते धान्य वाटपा पासून वंचित आहेत.

*सावनेर तालुक्यात एनपीएच कार्ड धारकांची यादी लांबलचक असुन त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामूळे त्यांच्या जिवनावर विपरीत परिणाम जाणवत आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना रोजगार मिळने कठीण झाले आहे त्यामूळे एनपीएच कार्ड धारकांना ज्यांचे कार्ड ऑन लाईन झाले नाहीत अश्या नागरिकांना अंत्योदय व अन्न सुरक्षा योजने प्रमाणे निःशुल्क धान्य वाटप करण्याचे आदेश देण्यात यावे हि विनंती निवेदनातून करण्यात आली असुन सदर निवेदन.कार्यवाहिस व माहितीस मा. सुनील केदार साहेब पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री म.रा.मा जिल्हाधिकारी साहेब नागपूर.मा. तहसीलदार साहेब सावनेर.मा.गटविकास अधिकार पंचायत समिती सावनेर आदिंना प्रेषित करुण तातडीने उपाययोजना व निशुल्क वितरण करणार्या धान्य व साखरेचे पैसे घेणाऱ्या वर योग्य कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …