*केळवद टोल नाक्यावर राडा़*
*अधिक टोल न देण्याच्या कारणावरून मीत्रासह टोल नाक्यावर केली हानमारी व तोडफोड*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन हद्दीतील मध्यप्रदेश सीमालागत असलेल्या टोल नाक्यावर दि.26 च्या मध्यरात्रीच्या दरम्यान वाहन चालकाजवळ फास्ट टँग नसल्याने वीना फास्ट टँग परिवहन नियमानुसार दुप्पट टोल भरण्याच्या वादावरुन वाहन चालक वीवेक व त्याच्या पाच सहा अज्ञात मीत्रांनी मीळून टोल नाक्यावरील कामगारांना मारहान करुण टोल नाक्याची तोडफोड करुण भारी नुकसान केल्याची दुर्दैवी घटना घडली*
*घटनेची माहिती मीळताच केळवद पोलीस स्टेशनचे एपीआय अर्जुन राठोड व त्यांचे सहकार्य कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीसांना येते बघून आरोपींनी मध्यप्रदेश सीमेतून आलेले आरोपी सौंसर च्या दिशेने पळ काढला*

*मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या दरम्यान टोल नाक्यावर कार्यरत कामगार आपल्या कर्तव्यावर असतांना चारचाकी वाहन क्र. एम.एच.40 एसी 6177 या वाहन चालकाचा फास्ट टँग बंद असल्याने त्यास नियमानुसार डबल टोल आकारनीचे देयक देण्यात आले त्यावर तो भडकला व शिवीगाळ करु पाहून घेण्याची धमकी देऊण निघून गेला परंतू सौंसर ला जाऊन परत जाऊन आपल्या साथीदारां सोबत आनुन सदर हानमारी व तोडफोडीँआ सुरुवात झाली असता सदर घटनेची सुचना केळवद पोलिसांना देण्यात आली .केळवद पोलीस टोल नाक्यावर पोहचण्याआधीच आरोपी विवेक व त्याचे अज्ञात साथीदारांनी सौसरच्या दिशेने पळ काढला पोलीसांनी त्यांचा पाठलाग ही केला परंतू आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले*

*फीर्यादी अविनाश हिरामण दगडे रा.केळवद याच्या तक्रारी वरूण केळवद पोलीस स्टेशन येथे भादवी 504,506,427 नुसार सौसर निवासी आरोपी विवेक व त्याच्या अज्ञात सहकार्यां विरुद्ध गुन्ह्याची नोंद करुण पीएसआय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असुन घटनास्थळी असलेल्या सुरक्षा कँमेर्यातून इतर आरोपींची ओळख तसेच घडलेला प्रकाराचे गांभीर्याने तपासणी करुण आरोपींच्या मुसक्या आवराण्याच्या तयारी केळवद पोलीसांनी केली आहे*
Maharashtra News Media सच की आवाज