*आयपीएल टी-२० क्रिकेट वर जुगार खेळतांना आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडले.*
*कारवाई दरम्यान कन्हान पोलीसांनी आरोपी जवळुन १,३९,६५० रूपयाचा मुद्देमाल केला जप्त.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत परिवेक्षाधीन पोलीस उप अधिक्षक, कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांनी अ़धिकारी व कर्मचार्या सह तारसा रोड शहिद चौक येथे छापा मारून आयपीएल टी-२० क्रिकेट वर पैश्याचा जुगार खेळतांना मिळुन आल्याने आरोपीस पकडुन व त्यांच्या जवळुन १,३९,६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली आहे .
बुधवार दिनांक.२८ एप्रिल ला रात्री १०.३० ते ११.३० वाजता च्या सुमारास कन्हान पोलीसांनी तारसा रोड शहीद चौक हनुमान नगर कन्हान येथील राहत्या घरी आरोपी कोमल लक्ष्मणराव पांजरे हा टि व्ही वर स्टार स्पोर्टस वन चॅनल लावुन सनराइजर्स हैदराबाद व चैन्नई सुपर किंग्स टिम मध्ये सुरू असलेल्या आयपीएल टी-२० च्या क्रिकेट मॅचवर बेटिंग करून पैश्याची बाजी लावुन लगवाडी व खायवाडी करून जुगार खेळतांना मिळुन आल्याने सरकार तर्फे फिर्यादी विशाल नरेंद्र शंभरकर बक्कन नंबर ९९३ यांच्या लेखी तक्रारीवरून कलम ४, ५ म जु का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीच्या ताब्यातील १) २४ इंच थंडर कम्पनीचा जुना टि व्ही किमत दहा हजार रू. २) लगवाडी, खायवाडी लिहीलेले रजिस्टर ७ किमत अंदाजे पाचशे रू, ३) पिवळया, काळ्या रंगाचा एक्सटेशन बोर्ड कि. शंभर रू, ४) सिटीझेन कंपनीचे ३ कॅल्कुलेटर प्रत्येकी दोनशे असे सहाशे रू. ५) पिसेल कंपनीचा रिमोड कि.दिडशे रू, ६) युसीएन एच डी कंपनीचा सेटअँप बॉक्स, रिमोड, चार्जर, सेट कि. दोन हजार, ७) फिक्ट पिवळा अंजता कंपनीची दिवालघडी कि. तीन हजार रू. ८) लावा कंपनीचा काळा रंगाचा मोबाईल त्या मध्ये ४ कंपनीचे सिमकार्ड व सॅनडिक्स कंपनीची १६ जीबी मेमरी कार्ड एकुण कि. तीन हजार रू. ९) लावा कंपनीचा काळया, सिल्वर रंगाचा मोबाईल त्या मध्ये ४ कंपनीचे सिमकार्ड एकुण कि. तीन हजार रू. १०) विवो कंपनीचा अँनड्राईड मोबाईल कि. दहा हजार रू ११) लगवाडी व खायवाडी वर लावलेले धंद्याचे नगदी १ लाख दहा हजार रू. असा एकुण १,३९,६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर, एपीआई सतिश मेश्राम, नापोशि कुणाल पारधी, पोशि शरद गिते, संजय बरोदिया, विशाल शंभरकर, मुकेश वाघाडे, मंगेश सोनटक्के, मपोशि रूपाली कुडमेघे, चालक नापोशि संदीप गेडाम आदि ने शिताफितीने कारवाई करून आरोपीस पकडले.