*सलील देशमुख यांच्या प्रयत्नातून नरखेड कोविड सेंटर येथे 10 जंबो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध*
*कोरोना आजारीना मिळाली संजिवीनी*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड – आज कोरोना महामारीने संपूर्ण नागपूर जिल्हा होरपळून निघाला आहे. नरखेड तालुक्यात सुद्धा दिवसागणिक कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
रुग्णांना नागपूर शहरात बेड उपलब्ध होत नाहीत.
या परिस्थितीत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण बरी होण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.
यातूनच सलील देशमुख, सदस्य जि.प. नागपूर यांच्या प्रयत्नातून नरखेड कोविद केंद्राला 10 जंबो ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले.
यामुळे नरखेड कोविद केंद्राला ऑक्सिजन साठा वाढविण्यासाठी मदत होईल आणि आवश्यक रुग्णांना नरखेड येथेच ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ शकतील. यामुळे रुग्णांची नागपूरला बेड साठी होणारी हेळसांड थांबेल आणि रुग्णांचे प्राण वाचविने शक्य होईल, असे मत नरखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश महंत यांनी मांडले.

अशा महत्त्व पूर्ण कामासाठी सलील देशमुख यांचे उपस्थितांनी आभार मानले.
याबरोबरच यापरिस्थितीत पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ आणि सततचा औषधी पुरवठा करणेही गरजेचे आहे याची मला जाणीव आहे.
या दृष्टिकोनातूनच आज नरखेड कोविद केंद्रावर 3 डॉक्टर्स, 4 ए. एन. एम. आणि 1 गी. एन.एम.
या प्रमाणे नवीन नियुक्त्या करण्यात आल्यात. मागच्या आठवड्यात सुद्धा तीन डॉक्टर आणि काही पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात करण्यात आली होती.
पुन्हा काही आवश्यक डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची येणाऱ्या काही दिवसात नियुक्ती होणार असल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले. यामुळे नरखेड येथे ग्रामीण रुग्णालय, कोविड केअर सेंटर आणि नव्याने सुरू होणारे विलागिकरण केंद्र येथे पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल.
यातच मागच्या आठवड्यातच कोविड केअर सेंटर येथे औषधींचा सुद्धा पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे डॉ. हरीश महंत यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर यांच्याशी सलील देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य होत असल्याचे राष्ट्रवादीचे नरखेड शहर अध्यक्ष श्री संजय चरडे यांनी सांगितले.
काटोल नरखेड तालुक्यातील या महामारीला तोंड देण्यासाठी मी सदैव जनतेसोबत आहे आणि आवश्यक ते सर्व करण्याची तयारी असल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले.
याप्रसंगी संजय चरडे, अध्यक्ष रा.काँ. नरखेड शहर, सचिन चरडे, न.प. बांधकाम सभापती, डॉ. हरीश महंत, वैद्यकीय अधिकारी, डॉ. मनीष, योगेश मांडवेकर, सदस्य रुग्ण कल्याण समिती, प्रा. नरेश तवले, आकाश जवादे, अजय सोमकुवर, सुशील डोंगरे, अनिल भुजाडे, निखिल धोटकर, पवन सौदागर, नेहाल अरखेल, अक्षय बालपांडे, शशी सरोदे, अजय तिवारी, शुभम मालाकर, अमोल नवघरे, मनीष अरखेल, ईश्वर रेवतकर आणि राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज