*महाराष्ट्र दिनानिमित्त मास्क वाटप* *पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी नागरिकांना कोवीड़ 19 दिशानिर्देश पालन कारण्याचे निवेदन*

*महाराष्ट्र दिनानिमित्त मास्क वाटप*

*पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी नागरिकांना कोवीड़ 19 दिशानिर्देश पालन कारण्याचे निवेदन*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया

सावनेरः पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दिनांक 1 .5 .2021 रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सकाळी 8-00 वाजता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर यशवंत बाबा झोपडपट्टी सावनेर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त सावनेर पो स्टे तर्फे पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सरंबळकर सावनेर तसेच मारुती मुलूक पोलीस निरीक्षक सावनेर व अधिकारी , पो अंमलदार यांचे हस्ते गरीब व गरजू व्यक्तींना मास्क चे वाटप करून त्यांना सोशल डिस्टन्स चे पालन करावे , नियमित हात धुवावे तसेच आपले कुटुंबाची काळजी घ्यावीत या बाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर मास्क वाटप करताना पोलीस स्टेशन येथील सपोनि सतीश पाटील, psi सागर करंडे व पोलीस अंमलदार व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी 8-00 चे दरम्यान शहरातील यशवंत बाबा नगर येथे पोहचून आबालवृद्धांसोबत संवाद साधत त्यांना वाढत्या कोरोना संक्रमणाची तिव्रता व त्यातून उदभवणारे कटू प्रसंग आपल्या परिवारावर ओढावू नये याकरीता शासनाने दर्शविलेल्या दिशानिर्देशाचे पालन करणे,सुरक्षित अंतर,नेहमी मास्कचे वापर,वरच्यावर हाताला स्वच्छ धुने,गर्दीचे ठीकाण टाळणे,अवश्यक असल्यासच घराबाहेर पडने,कोवीड़ टेस्टिंग करणे,लसीकरणाचा लाभ घेणे सोबतच इतरांनाही प्रवृत्त करणे आदींचे निवेदन नागरिकांना त्यांच्या घरो घरी जाऊन पटवून सांगितले.

*आपल्या दारी इतके मोठे अधिकारी येऊण आपल्याला विनंती करत असल्याचे पाहून वस्तीत राहणारे गोरगरीब भारावून गेले व साहेब आम्ही आपण दिलेल्या सुचनांचे नक्कीच पालन करु असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …