Breaking News

*विनयभंग*

*विनयभंग

सावनेर – पो.स्टे . सावनेर : दिनांक 29/04/2021 चे 14.00 वा . ते 18.00 वा . दरम्यान 19 वर्षीय फिर्यादी / पीडित हि तिच्या आई सोबत आरोपी नामे- डॉ . अमोल बडगे , रा . रेल्वे स्टेशन रोड सावनरे याचे कडे सोनोग्राफी करण्यासाठी गेली होती . त्यादरम्यान आरोपीने पीडितेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला . तसेच आरोपीने पीडितेला मोबाईल वरून फोन करून मिला मॅसेज करून तिचा पाठलाग केला . सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे . सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 354 ( ए ) , 354 ( बी ) , 354 ( डी ) , 354 भा.दं.वि. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरू आहे . गुन्हयाचा पुढील तपास मसपोनि रासकर मो . क्र . 9082196080 या करीत आहे .


संपूर्ण जग डाँक्टरांवर पुर्ण विश्वास ठेऊन आपल्या सर्व व्याधी त्यांना निसंकोच पणे सांगुन त्यांनी दिलेल्या सल्यानुसार औषधोपचार करतो व स्वस्थ होतो.सध्या कोरोना काळात सर्व डाँक्टर देवदूत म्हणून नागरिकांना सेवा देत त्यांच्या प्राणाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटत आहे.तर डॉक्टरांच्या पेश्याला बदनाम करणारे अनैतिक कार्य करणाऱ्या अश्या डाँक्टरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …