Breaking News

*जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीला अटक*

*जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीला अटक*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर ः पोलिस स्टेशन केळवद ची कारवाई आज दिनांक 03/05/2021 रोजी पोउपनि अर्जुन राठोड हे पो.स्टे . केळवद ला हजर असताना त्यांना मुखबिरद्वारे विश्वनिय गुप्त माहीती मिळाली कि टाटा मॅजिक गाडी क्र . एम एच 14 डी.एम -9423 मध्ये सावळी येथुन जनावरे भरुन कत्तली करीता नागपुर ला जनावरे घेउन जाणार आहे . या खबरे वरुन पोउपनि अर्जुन राठोड हे स्टाफसह सावळी फाटा येथे पोहचुन नाकाबंदी केली असता सावळी गावाकडुन सकाळी 05.00 वा . चे सुमारास एक चारचाकी गाडी नाकाबंदीच्या दिशेने येतांना दिसली . सदर वाहन हे नाकाबंदीचे काही अंतरावर थांबवुन सदर वाहनातील 3 इसम अंधाराचा फायदा घेउन पळु लागले त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता वाहनातील 1 इसम हा मिळुन आला त्यास ताब्यात घेउन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नौशाद रफिक शेख वय -31 वर्ष रा- सावळी तह- सावनेर असे सांगितले . आरोपीच्या गाडीची पाहणी केली असता वाहनाचे मागील डाल्यामध्ये जनावरे दाटीवाटीने कोंबुन आकुड दोरीने पाय व तोंड बांधुन दिसल्यामुले डाल्यामध्ये 2 नग कालवड गाई गौवंश कि . 14,000 / – रु . व 5 नग बैल गोरे गौवंश कि . 40,000 / – रु चे जनावरांना अत्यंत क्रुर व निर्यदयतेने डांबुन आकडुन दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता कोवून दाटीवाटीने अपु – या जागेत ठेवुन कत्तली साठी अवैध्य रीत्या वाहतुक करतांना मिळुन आला . आरोपीच्या ताब्यातुन जनावरे व वाहनासह असा एकुण किमती 3,54,000 / -रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे . पोलीस स्टेशन केळवद येथे आरोपीतांविरूद्ध अप क्र . 76/2021 कलम 34 भादवी सहकलम -11 ( 1 ) ( घ ) ( ड ) ( च ) प्राण्यांना निर्देयतेने वागवने प्रति अधि .1960 सहकलम- 5 ( अ ) , 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम –1995 सहकलम- 119 मपोका सहकलम- 192 ( अ ) मो वा.का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन यातील आरोपी नामे 1 ) नौशाद रफिक शेख वय -31 वर्ष रा- सावळी तह- सावनेर यास सुचनापत्रावर सोडण्यात आले असुन फरार आरोपी नामे- सावनेर 2 ) गाडी चालक नामे मोहम्मद फैजान कुरेशी व त्याचा सोबती 3 ) मोहम्मद जमील अब्दुल रकिम दोन्ही रा- नागपुर यांचा शोध सुरु असुन पुढील तपास पोउपनि अर्जुन राठोड पो.स्टे केळवद हे करीत आहेत . सदरची कार्यवाही मा . श्री राकेश ओला , पोलीस अधिक्षक नागपूर ग्रा . , मा.श्री राहुल माकनीकर , अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रा . , मा . श्री अशोक सरबंळकर , उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अर्जुन राठोड , पोशि धोंडुतात्या देवकत्ते , पोशि सचिन येळकर , चानापोशि गुणवंता डाखोळे यांनी केली आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …