Breaking News

*मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रावर अॉंटीजन टेस्ट नाही तर आर.टी.पी.सी.आर च्या होतात फक्त ५० टेस्ट* *टेस्टींग कमी असल्याने मृत्यू दर वाढला* *कोविड रूग्ण बसतात सार्वजनिक ठिकाणी* *शहरात दररोज ५०० अॉटीजन व आर.टी.पी.आर टेस्ट उपलब्ध करण्याची मागणी*

*मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रावर अॉंटीजन टेस्ट नाही तर आर.टी.पी.सी.आर च्या होतात फक्त ५० टेस्ट*

*टेस्टींग कमी असल्याने मृत्यू दर वाढला*

*कोविड रूग्ण बसतात सार्वजनिक ठिकाणी*

*शहरात दररोज ५०० अॉटीजन व आर.टी.पी.आर टेस्ट उपलब्ध करण्याची मागणी*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

मोवाड – प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १०-१२ दिवसा पासून अॉटीजन टेस्टींग किटा नाही. त्या मुळे शहरासह परिसातील रूग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरात अॉटीजन उपलब्ध नसल्यामुळे रूग्णाना आपला रिपोर्ट साठी ४-५ दिवस थांबाव लागत आहे. रिपोर्ट येत नसल्यामुळे रूग्णाचा उपचार होत नाही आहे. त्यामुळे नागरिकांना थेट मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे.

शहारात व ग्रामीण भागातील रूग्ण व रूग्णाचे नातेवाईक सकाळी ८ वाजता पासून येऊन थांबतात . पण मात्र शहरात ५० टेस्ट होत असल्यामुळे रूग्ण व रूग्णाच्या नातेवाईकांना वापस जाव लागते. दररोज २५० -३०० रूग्ण टेस्टींग साठी येतात पण मात्र त्यांना वापस जावे लागते.
शहरात दररोज वाढती रूग्णसंख्या सह दररोज मृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोविड रूग्णांना पोझीटीव्ह असल्याची माहीती मिळत नसल्यामुळे ते शहरातील सार्वजनिक ठिकाणी येऊन बसतात त्यामुळे शहरातील कोविड रूग्णसंख्या न थांबता दिवसेना दिवस वाढत चालली आहे.

टेस्टींग किट कमी असल्यामुळे रूग्ण टेस्टींग न करता बाहेर फिरत आहे. तर होम अॉसोलेशन रूग्णावर प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे ते रूग्ण सुध्दा बाहेर फिरत आहे. टेस्टींग किट ची संख्या कमी असल्यामुळे रूग्णाना कोविड असल्याची माहीती मिळत नाही . व कोविड वाढला की त्यांना मृत्यू शी झुंज द्यावी लागत आहे.
शहरातील व परीसरातील नागरिकांची अॉटीजन नसल्यामुळे आर.टि.पी.सी.आर टेस्ट केली जात आहे त्याचे रिपोर्ट ४ दिवसांनी मिळत आहे. तो पर्यत तो रूग्ण अनेकांच्या संपर्कात येऊन कोविड रुग्ण संख्या वाढत आहे. कोविड ला आळा बसविण्यासाठी दररोज ५०० अॉटीजन टेस्ट किट व आर.टी.पी.सी.आर किटची संख्या मोवाड प्राथमिक आरोग्य केंदावर करण्यात यावी .ज्यामुळे शहरातील कोविड वर आळा व मृत्यू दरावर आळा बसेल अशी मागणी शहरातील नागरीक करत आहे.

आज प्राथमिक आरोग्य केंद्राला ५० आरटीपीसीआर किट आल्या होत्या तितक्या पण नागरिकांच्या टेस्टींग गेल्या आहे.
– डॉ.संजय सोळकी
वैद्यकीय अधिकारी मोवाड

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …