Breaking News

*कृषी विभागा व्दारे तुर, धान, सोयाबीन बीज उगवण क्षमता प्रात्याक्षिक व मार्गदर्शन*

*कृषी विभागा व्दारे तुर, धान, सोयाबीन बीज उगवण क्षमता प्रात्याक्षिक व मार्गदर्शन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील गावात जावुन मंडळ कृषी अधिकारी व सहाय्यकांनी बीज उगवण क्षमता प्रास्ताविक ३% मिठ प्रक्रिया, पिकाची फेर पालट, बियाणे खरेदी विषयी ग्रामस्थ शेतकर्यांना मार्गदर्शन केले.


मंगळवार (दि.४) मे २०२१ ला पारशिवनी कृषी विभागांतर्गत मंडळ कृषी अधिकारी व्दारे मौजा गुंढरी (पांडे), घुकशी, बखारी, गोंडेगाव व बोरडा या गावात तुर, धान, सोयाबीन बीज उगवण क्षमता प्रात्याक्षिक करून समजवुन सांगत धानाची ३% मिठाची बिजप्रक्रिया, पिकाची फेरपालट, बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी आदी शेतीच्या महत्वाच्या विषयावर मा. मंडळ कृषी अधिकारी श्री. जी. बी. वाघ साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थ शेतकर्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मा.कृ.प. कन्हान श्री. कुबडे सर, कृ. से. राठोड, ठोंबरे, गटकळ, ढंगारे, शेख, झोड सह ग्रामस्थ शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …