*कोराडी देवी मंदीर रोडाची गंभीर अवस्था*

*रोडात खडा कि खड्डयात रोड*
*प्रतिनिधी- दिलीप येवले
*खापरखेडा कोराडी देवी मंदीर रोडाची अवस्था पाहण्यासारखी आहे या रोडाने लाखो लोकांचे अवागम जवागम होते स्थानिक लोकाना कोराडी नागपुरला जाण्याकरिता हा उत्तम मार्ग असल्यामुळे लाखो लोक येणे जाणे करतात मात्र या रोडाला मोठ मोठे भगदाड पडलेले आहे शेतकरी सेलिब्रशन लाँन जवळ मोठ मोठे खड्डे पडलेले असून सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने खड्डयात पाणी भरलेले आहेत दुचाकी स्वाराला गाडी चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे काही नागरिक या रोडानी जखमी सुुध्दा झालेले आहे कोणाला तर अपंगतत्व सुध्दा आलेले आहे याची रोडवरती कन्व्हर बेल्टचे चे काम युध्दपातळीपर सुरू आहे कन्वर बेल्ट उभे करण्याकरिता काँलम तयार करण्याकरिता खड्डे करण्यात आलेले आहेत तिथे माती रोड वर येत असुन दुचाकि गाड्या घसरत आहे भवन्स शाळेजवळ पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचुन राहते तिथे नदीचे रूप पाहायला मिळते दिनांक 29/09/2019 पासुन अश्विन नवरात्र महोत्सव यात्रा कोराडी श्री महालक्ष्मी जंगदबा मातेची यात्रा सुरू होत मातेच्या दर्शनाकरिता दुर दुरून लाखो भाविक श्रध्दाळू येतात मात्र रोड खराब असल्याने नागरिकामध्ये संतापाचा सुर दिसून येत आहे. या रोड कडे प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे*
Maharashtra News Media सच की आवाज