Breaking News

*संघाचा अकोला कोविड रुग्णसेवा प्रकल्प*

*संघाचा अकोला कोविड रुग्णसेवा प्रकल्प*

विशेष प्रतिनिधि

अकोला – रा. स्व. संघ., अकोलातर्फे आज बुधवार, दि. ०५ मे रोजी कोरोना निदानीत रुग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. सुधीर कॉलनी जवळील जवाहर नगरस्थित *श्रीमती शोभादेवी गोयनका* यांच्या भव्य इमारतीत या उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा आज सकाळी ११.०० वा. अत्यंत साधेपणाने संपन्न झाला.

कोविड उपचार केंद्रासाठी रा. स्व.संघातर्फे सुयोग्य जागेची पाहणी गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अशातच समाज बांधिलकी जपणाऱ्या गोयनका कुटुंबियांना ही बाब समजली. कोरोना प्रकोपाच्या या भयावह वातावरणात, स्वतःची मालकी असलेली चारमजली सुसज्ज इमारत आपल्या समाजबांधवांच्या कामी येत नसेल तर काय ती उपयोगाची..!? ही संवेदनशीलता गोयनका कुटुंबाला संघापर्यंत घेऊन आली. अमित व सुमित ही अकोल्यात व्यापार करणारी दोन मुले.. आणि रायपूरला एक निष्णात डॉक्टर असलेला हर्षित नावाचा मुलगा, असे आईप्रती कृतज्ञ असलेली ही तीन मुले. हर्षितने रायपूरहून सारी ही पुण्यप्रद जुळवाजुळव घडवून आणली. झाले.. मने जुळली व दुर्दम्य इच्छशक्ती असली की मग कशाचीच कमी भासत नाही. एकेक सेवाव्रती डॉक्टर जुळत गेले, कार्यकर्ते तर सेवाकार्यासाठी सदातत्पर असतातच. नव्हे, ते त्यांचे स्वाभाविक काम आहे. सेवाभाव हा मूळ पिंड असलेल्या सत्पुरुषांनी आपला समाज पर्याप्त व्यापलेला आहे. या सज्जनशक्तीला एकसूत्रात गुंफण्याचे काम, जे अजून भक्कम बाकी आहे, ते संघ नित्यनेमाने करतो. महिला डॉक्टर/कार्यकर्त्या देखील सेवाउपक्रमास जोडल्या गेल्या आहेत.

आज श्रीमती शोभादेवी गोयनका ह्यांच्या शुभहस्ते साधे दीपप्रज्ज्वलन होऊन कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. भूमिका-प्रास्ताविक, पसायदान.. बस. समाजाची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली, याबद्दल शोभादेवींनी संघाचेच आभार मानले. हे उलटेच झाले. संघ संबंधित न्यास, आदर्श संस्कार मंडळांतर्गत हा उपक्रम चालविल्या जाणार असून आज लोकार्पणप्रसंगी अगदी मोजके घटक उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख या नात्याने मोहन मिश्रा काम बघतोय, आणि त्याला सह म्हणून मेडिकल लाईनचा अनुभव असलेला भूषण पिंपळगांवकर जुंपला आहे.

डॉ. सदानंद भुसारी व डॉ. तुषार चरखा या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात अन्य कुशल कर्मचारी सेवा देतील. तूर्तास, उपचारासहित विलगीकरण यासाठी ७० बेड्सची व्यवस्था सज्ज असून येत्या तीन दिवसात १४ बेड्सचे ICU कार्यान्वित होईल. ऑक्सिजन संबंधातील मामुली तांत्रिक कामे बाकी आहेत. प्रचंड उभारणी, साहित्य तुटवडा व कारागिरांची चणचण यामुळे एकंदरीतच प्रकल्पास थोडा विलंब झाला.

अशा विपरीत स्थितीत हॉस्पिटल उभे करण्याचे काम आजवर या क्षेत्राचा अनुभव नसलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहे. ‘ना नफा – ना तोटा’ या मूल्यावर चालणाऱ्या या सेवा उपक्रमास समाजमन निश्चित सहकार्य करेल. आर्थिक सहयोगाचे आवाहन .
संपर्क क्रमांक असे_ 9689024709 / 9689025708

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …