*वाढत्या कोरोना विषाणूजन्य च्या प्रादुर्भाव होत असल्याने सावधगिरीचा उपय*
*ऑक्सिजन करिता वाढीव यंत्रणेची गरज ब्रिजभूषण पाझारे*
कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना :- विशेष कोरोनाची भीती लक्षात घेता घुग्घुस महामारी कोरोना परिस्थितीत घुग्घुस शहरासाठी वरदान ठरलेल्या वेकोली चे राजीव रतन रुग्णालयाची सध्या ओळख झालेली आहे. येथील आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व इतर सेवक दिवसरात्र रुग्णाच्या सेवेत कर्तव्य बजावीत आहे. घुग्घुस येथे मोठ्या प्रमाणात वेकोलि परिसर आहे.
वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात घुग्घुस व वेकोलिच्या लोकवस्तीत दिसून येत आहे. सध्या राजीव रतन रुग्णालयात येथे २८ ऑक्सिजन बेड तर व २८ साधे बेड्स उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेत येत्या काही दिवसात १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १५ पूर्ण क्षमतेचे व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन प्लॉट लवकरात लवकर उपलब्ध करण्याची गरज आहे. कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत WHO ने निर्देश दिले आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता वेकोली मार्फत नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
आज माजी समाजकल्याण सभापती तथा जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी राजीव रतन वैदकीय अधीक्षक डॉ. आनंदे यांची भेट घेऊन रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या असता याठिकाणी ऑक्सिजन कमी पडत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित वेकोली महाप्रबंधक व जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली.
राजीव रतन रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. आनंदे वैद्यकीयपदाचे कर्तव्य बजावीत कोरोना रुग्णाच्या सेवेत रात्रदिवस कार्य करिता आहे. राजीव रतन रुग्नालयातील डॉ.चौधरी व वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असणारे १०० आरोग्य सेवक व सहाय्यक कर्तव्य बजावीत आहे. तसेच कोविड उपचार केंद्रउभारण्यास नेहमी अग्रस्थानी असणारे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीरभाऊ मूनगंटीवार, माजी केंद्रीय गृह मंत्री हंसराजभैय्या अहिर व वेकोली वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे साहेब यांचे ब्रिजभूषण पाझारे यांनी आभार मानले.
Maharashtra News Media सच की आवाज