Breaking News

*सार्वजनिक वाचणालया व्दारे राजश्री छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन*

*सार्वजनिक वाचणालया व्दारे राजश्री छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे राजश्री छत्रपती शाहु महाराज यांचा पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन कोरोना काळातील शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून राजश्री छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.


गुरूवार (दि.६) मे राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे करुन व कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधरराव अवचट, प्रमुख अतिथी पत्रकार कमलसिंह यादव यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहु महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून दोन मिंनटाचे मौन धारण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करित अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांचे तापमान व ऑक्सीजन लेवल तपासण्यात आले .
याप्रसंगी अध्यक्ष गंगाधरराव अवचट, प्रमुख अतिथी पत्रकार कमल सिंह यादव, सचिव मनोहर कोल्हे, कोषाध्यक्ष दिनकर राव मस्के, गजेंन्द्र गिरडकर, पुष्पाबाई बर्लेवार, अल्काबाई कोल्हे, श्याम बारई ग्रंथपाल सह आदि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव मनोहर कोल्हे यांनी केले तर आभार श्याम बारई यांनी व्यकत केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …