Breaking News

*एम.जी.नगर कन्हान चे चार युवक कन्हान नदी वर पोहायला गेले असता दोघांचा कन्हान नदीपात्रात बुडून मुत्यु* *कन्हान नदी पात्रात पोहण्याचा मोह दोन मुलाच्या जिवावर बेतला*

*एम.जी.नगर कन्हान चे चार युवक कन्हान नदी वर पोहायला गेले असता दोघांचा कन्हान नदीपात्रात बुडून मुत्यु*

 

 

*कन्हान नदी पात्रात पोहण्याचा मोह दोन मुलाच्या जिवावर बेतला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक १ एम.जी. नगर कन्हान येथील राहणारे चार युवक कन्हान नदी सत्रापुर शिवारातील नदीपात्रात पोहतांना चार युवका पैकी हासिम पुरवले व रोहन भिसे या दोन युवकाचा नदी पात्रातील खोल पाण्यात बुडाल्याने मुत्यु झाला. या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच कन्हान पोलीसांनी जिवन रक्षक दलाच्या मदतीने मुत्युदेह बाहेर काढुन उत्तरीय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक.७ मई ला दुपारी ३ वाजता च्या सुमारास प्रभाग क्रमांक १ एम.जी. नगर कन्हान येथे राहणारे चार युवक कन्हान नदीच्या सत्रापुर शिवार नदी पात्रातील पाण्यात पोहतांना दोन तास मौज मस्ती करित असतांना खोल पाण्याचा डोहाचा अंदाज न आल्याने हासिम नंदकिशोर पुरवले वय १२ वर्ष व रोहन रणजीत पिसे वय १० वर्ष दोन्ही राहणार प्रभाग क्रमांक १ एम.जी. नगर कन्हान हे पाण्यात बुडाले असता सोबत च्या दोन युवकांनी त्याचा शोध घेतला पण ते मिळुन न आल्याने त्यांनी घाबरून परिसरातील नागारीकांना व तेजस संस्थेचे उपाध्यक्ष देविदास पठारे यांना सांगितल्याने सत्रापुर व एम जी नगरातील व परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचुन त्याच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते मिळुन न आल्याने कन्हान पोलीसांना सुचना देताच कन्हान पोलीस स्टेशनचे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजीतकुमार क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक जावेद शेख , हेडकाॅस्टेबल जोसफ, पोलीस शिपाई मुकेश वाघाडे, शरद गीते, संजय बदोरिया, कुणाल पारधी, विरेन्द्र चौधरी सह घटनास्थळी दाखल होऊन व जिवन रक्षक दलाला बोलावुन त्यांचा शोध करित सायंकाळी पाच वाजता दोघांचे मृतदेह बाहेर काढुन पंचनामा करून शासाकिय कामठी उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आले. पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार श्रीरसागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरिक्षक जावेद शेख सह पोलीस कर्मचारी करित आहे

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …