*कन्हान परिसरात नवीन २५ रूग्णांची भर*
*कन्हान चाचणीत २४ व साटक १ असे २५ आढळुन एकुण ३९२८ रूग्ण.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड – १९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे शुक्रवार (दि.७) मे ला रॅपेट ४ चाचणीत १, स्वॅब ६६ चाचणीत २३, साटक रॅपेट १९ चाचणीत १ असे कन्हान परिसरात २५ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण ३९२८ रूग्ण संख्या झाली आहे.
गुरूवार (दि.६) मे २१ पर्यंत कन्हान परिसर ३९०३ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान व्दारे नविन नगरपरिषद भवन येथे (दि.७) मे शुक्रवार ला रॅपेट ४,स्वॅब ९५ अश्या ९९ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट ४ चाचणीत १, (दि.६) च्या स्वॅब ६६ चाचणीत २३ रूग्ण यात कन्हान ९, कांन्द्री ८, टेकाडी २, गोंडेगाव १, एंसबा १, खोपडी १, नेरी १ असे २३ तर प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक रॅपेट १९ चाचणीत चांपा १ असे एकुण २५ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ३९२८ रूग्ण संख्या झाली. यातील ३३११ रूग्ण बरे झाले. तर सध्या ५२० बाधित रूग्ण असुन कन्हान (५०) कांन्द्री (१३) टेकाडी (८) निलज (२) गहुहिवरा (३) जुनिकामठी (७) साटक (२) वराडा (६) गोंडेगाव (४) बनपुरी (१) एंसबा १ असे कन्हान परिसरात आता पर्यंत एकुण ९७ रूग्णांचा मुत्यु झाला आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – ७/०५/२०२१
जुने एकुण – ३९०३
नवीन – २५
एकुण – ३९२८
मुत्यु – ९७
बरे झाले – ३३११
बाधित रूग्ण – ५२०
Maharashtra News Media सच की आवाज