Breaking News

*मोवाड नगर परिषदेत जिल्हाधिकारी याची आढावा बैठक संपन्न* *कोरोना तिसऱ्या लाटेचे नियोजन*

*मोवाड नगर परिषदेत जिल्हाधिकारी याची आढावा बैठक संपन्न*

*कोरोना तिसऱ्या लाटेचे नियोजन*

नरखेड तालुका प्रतिमा – श्रीकांत मालधुरे

मोवाड – शहरात वाढता कोरोना यामुळे नागपूर चे जिल्हाधिकारी यांनी रवींद्र ठाकरे यांनी कोरोना संदर्भात दिलेले प्रतिबंधक कायदे ची अंबलबजावणी ही मोवाड शहरात योग्य प्रकारे होत आहे की नाही याची स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण माहिती ही मोवाड ची
मुख्यधिकारी पल्लवी राउत यांच्या कडून जाणून घेतली.व मुख्यधिकारी यांना आदेशदिलेल्या की जो व्यक्ती कोरोना बांधीत असले व तो जर शहरात सर्वाजनिक ठिकाणी फिरत असेल तर त्याच्या वर साथ प्रतिबंधमक नियमानुसार कठोर कार्यवाही चे आदेश दिले . तसेच खाजगी डॉक्टर जवळ जर कोरोना चे लक्षणे असलेल्या व्यक्ती आलेस त्यांनी मोवाड प्राथमिक आरोग्य केन्द्रस कडवावे या संदर्भात पत्र हे खाजगी दवाखान्याला देणेचे निर्देश दिले.
नरखेड तालुक्यात व मोवाड ला आँटिजन व आर .टि.पी सी आर ची टेस्ट जास्त दिली जाईल.मोवाड शहरात येणारे अमरावती व मध्यप्रदेश राज्यातील रस्त्यावर कोरोना तपासणी करणेचे सांगितले ज्यामुळे फक्त कोरोना नसलेले लोकांनाच प्रवेश असेल याचे नियोजन करणेस सांगितले मोवाड शहरातील पाण्यात ६ महीने पासून बँलिचिग पावडर टाकले आहेत.या विषयी सांगितले असतात जिल्हाधिकारीनी ही समस्या तात्काळ सोडविण्यासाठी सांगितले ले ,तसेच प्रतिबंध सुचना पत्र हे कोरोना आजारी च्या घरी लावणेचे सांगितले , प्राथमिक आरोग्य केन्द्र नवीन आरोग्य कर्मचारी देणेचे आश्वासन दिले .यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी श्रीकांत उमरकर काटोल,,तहसीलदार जाधव नरखेड ,गटविकास अधिकारी मोहळ नरखेड ,ठाणेदार गिरासे, डॉ संजय सोळकी आरोग्य आधिकारी, भावना सेंदरे,सुपवाजर यांच्या सह भाजप जिल्हा उपाध्यक्ष उकेश चव्हाण, युवा सेना तालुका प्रमुख ललित खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष अनिल साठोने,रवीं माळोदे,ईसमाईल बारुदवाले,दिनेश पांडे, राहुल चौव्हान पत्रकार आविनाश गजिभिये,श्रीकांत मालधुरे,,मुख्यधिकारी पल्पवी राउत,प्रशासकीय अधिकारी नितीन तपकिरी, दंतात्रेय चाटी न.प.आधिकारी, व ईतर कर्मचारी न.प व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारनी केले आवाहन

मोवाड शहरातील राजकीय ,सामाजिक, व पत्रकारांना कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वानी एकजुटीने प्रशासनाला सहकार्य करणेच्या आवाहन केले जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे नागपूर

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …