*कन्हान पोलीसांनी पिपरी येथे देशी दारूच्या १५ निपा सह एका आरोपीला पकडले.*

*कारवाई दरम्यान एकुण ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पुढील तपास केला सुरु*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पिपरी प्रभाक क्रमांक .६ येथे कन्हान पोलीसांनी आरोपी कांताबाई यशवंत बिरोले यांचा घरी धाड मारून देशी दारूच्या १५ निपा सह एकुण ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक.४ मे २०२१ ला सकाळी ०८:४५ ते ०९:१५ वाजता च्या सुमारास कन्हान पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून आरोपी कांताबाई यशवंत बिरोले वय ६० वर्ष राहणार पिपरी प्रभाग क्रमांक .६ कन्हान यांच्या घरी धाड मारली असता त्यांचा ताब्यातुन एका पांढर्या रंगाच्या पिशवीत देशी दारू संत्रा भिंगरी नंबर एक च्या १५ निपा प्रत्येकी १८० एम एल प्रमाणे २७०० एम एल किंमत ६० रुपये प्रमाणे एकुण ९०० रुपयाचा माल अवैधरित्या विनापरवाना मिळुन आल्याने सरकार तर्फे पोस्टे कन्हान पोहवा अरूणकुमार सहारे बक्कल नं. ३५६ यांचा तक्रारी वरून आरोपी कांताबाई यशवंत बिरोले विरुद्ध ६५ (ई) मदाका अन्वये गुन्हा दाखल करून तपास घेण्यात आला. सदर आरोपी कांताबाई यशवंत बिरोले यास कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचा आदेशा वरुन सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र मा. न्यायालयात पेश करते वेळी हजर राहण्या बाबत चे सुचना पत्र देऊन सोडण्यात आले.
Maharashtra News Media सच की आवाज