Breaking News

*शितला माता पुजनाने कोरोना हद्दपार करण्यास आराधना*

*शितला माता पुजनाने कोरोना हद्दपार करण्यास आराधना*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्याने इंदिरा नगर कन्हान व माहुली बचत गटाच्या महिला, मुलीं व सोबत परिवारच्या महिलांनी डोक्यावर कलश भरून पाणी कडुनिंबाच्या डाळीसह आणुन शितला माता मंदिर कांन्द्री-कन्हान येथे माता राणीचे कलश च्या पाण्याने स्नान, अभिषेक व विधिवत पुजा अर्चना, आरती करून संपुर्ण देशातुन आणि परिसरातुन कोरोना विषाणु महामारी हद्दपार करित संपविण्याची, प्रार्थना, आराधना करण्यात आली.
रविवार (दि.९) मे २०२१ ला सकाळी ९ वाजता इंदिरा नगर कन्हान व माहुली बचत गटाच्या महिला, मुलीं व सोबत परिवारच्या महिलांनी डोक्यावर कलश पाण्याने भरून कडुनिंबाच्या डाळी सह आणुन कन्हान कांद्रीच्या सिमेवर असलेल्या शितला माता मंदिरात कडुनिंबाच्या डाळीने स्वच्छता करित माता राणीचे कलशा च्या पावन पाण्याने स्नान, अभिषेक आणि विधिवत पुजा अर्चना, आरती करून शितला मातेस प्रार्थना करून मानवाच्या कल्याणा करिता संपुर्ण देशातुन आणि परिसरातुन कोरोना विषाणु महामारी हद्दपार करित संपविण्याची आराधना करण्यात आली. प्रसाद वितरण करून विधीवत पुजा अर्चना करण्याकरिता सौ छाया रंग, मंगला किरपान, उर्मिला भोले, सुषमा भोस्कर, युगा भोले, भारती भोस्कर, वैशाली कभे, उज्वला लोडेकर, नितु किरपान, दामिनी पोतदार, प्रगती बानवकुळे, कल्पना भागलकर, आशा हटवार, शोभा वझे, हिरा वंजारी, वंदना सरोदे, लक्ष्मी देशमुख, शारदा सरोदे, सुनिता हिवरकर, उषा वंजारी सह मुली, महिलांनी उपस्थित राहुन परिश्रम घेतले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …