*कन्हान पोलीसांनी कांद्री येथे धाड मारून जुगार पकडला*
*दहा आरोपींना पकडुन ३,७५,३६० रूपयांचा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीसांना पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहिती वरून सापळा रचुन हरिहर नगर कांद्री येथे धाड मारून जुगार खेळतांना दहा आरोपींना पकडुन त्याच्या ताब्यातील ५२ पत्ते, ३ दुचाकी, ४ मोबाईल, डावावरील नगदी ३५३६० रू असा एकुण ३७५३६० रूपयाचा मुद्देमाल जप्त करुन ही कारवाई करण्यात आली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक १० मई ला कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर हयांना पेट्रोलिंग दरम्यान प्राप्त झालेल्या गुप्त माहिती वरून पोलीस अधिकारी व कर्मचार्या सह एस व्ही एस कॅटर्स च्या बाजुला सार्वजनिक स्थळी हरिहर नगर कांद्री येथील सार्वजनिक स्थळी जुगार खेळतांना सापळा रचुन सायंकाळी १७.१० ते १८ वाजता धाड मारली असता १० आरोपींना ५२ तासपत्यावर पैश्याची हारजित खेळतांना बाजीवरील नगदी ३५३६० रूपये सह रंगेहाथ पकडुन त्यांच्या ताब्यातील यामाहा एफझेडएस दुचाकी क्र एम एच ४९-एस ००५८ किंमत १ लाख १० हजार रूपए, सुझकी दुचाकी एमएच ४० बी बी ७८२८ किंमत १ लाख २० हजार रूपए, स्पेंडर दुचाकी एमएच ४० एम ८८६३ किंमत ७० हजार रूपए , ओपो कंपनीचे २, विवो कंपनीचा १, एमआय कंपनीचा १ असे ४ अँनड्राईड मोबाईल किंमत ४० हजार रूपए , असा एकुण ३,७५,३६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे पोशि संजय बरोदिया यांचा लेखी तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशन ला कलम १२ मजुका अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना सुचना पत्रावर सोडुन तपासात घेतला आहे.
सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक राहुल माखणीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी मुखत्तार बागवाण यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर, सपोनि सतिश मेश्राम, एएसआय येशु जोसेफ, नापोशि कुणाल पारधी, राहुल रंगारी, पोशि शरद गिते, संजय बरोदिया, विशाल शंभरकर, मुकेश वाघाडे, सुधिर चव्हाण, चालक नापोशि संदीप गेडाम आदि च्या सहकार्याने शिताफितीने धाड मारून आरोपीस जुगार खेळताना रंगेहाथ पकडुन कारवाई केली.
Maharashtra News Media सच की आवाज