Breaking News

*कन्हान शहर महामार्गाचे पथदिवे कधी सुरु होणार ?* *रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असल्याने चोरी व अपघाताची दाट शक्यता वाढली.* *पावसाळया पुर्वी कन्हान शहर महामार्गा वरील पथदिवे सुरू करण्याची मागणी.*

*कन्हान शहर महामार्गाचे पथदिवे कधी सुरु होणार ?*

*रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असल्याने चोरी व अपघाताची दाट शक्यता वाढली.*

*पावसाळया पुर्वी कन्हान शहर महामार्गा वरील पथदिवे सुरू करण्याची मागणी.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर ऑटोमेटिव्ह चौका पासुन टेकाडी फाटा पर्यंत केसीसी बिल्डीकाॅम कंपनीने रस्त्याचे सिमेंटीकरण करून राष्ट्रीय महामार्ग च्या दोन्ही बाजुला दोन वर्षापुर्वी पथदिवे लावण्यात आले असुन आता पर्यंत सुरु नसल्याने रात्रीच्या वेळी महामार्गा वर अंधाराचे साम्राज्य असल्याने रस्त्या लगतच्या दुकान व घरात चोर्या व वाहनाने अपघाताची दाट शक्यता वाढली असुन सुध्दा संबधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे महामार्गावरील पथदिवे कधी सुरु होणार? असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे.
ऑटोमेटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी फाटया पर्यंत नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ चे केसीसी बिल्डीकाॅम कंपनी द्वारे १८ किलो मीटर च्या सिमेंट रस्त्याचे निर्माण काम चार ते पाच वर्षापुर्वी सुरु केले असुन आतापर्यंत काम पुर्ण झालेले नाही. हा रस्ता भिलगाव, कामठी, कन्हान, कांन्द्री या दाट लोक वस्तीच्या शहर, गावातुन जात असल्याने रस्त्यांचा बांधकाम करतांना सदर गावातली चालु स्ट्रीट लाईट (पथ दिवे) असलेले शेकडो विद्युत खांब काढुन नेण्यात आले असुन नविन विद्युत खांब व पथदिवे लावण्यात आले.

परंतु ते बंदच असतात लोकांच्या निवेदनाच्या मागणी स्तोवर अमावश्या, पौर्णिमे सारखे कधी एकीकडचे तर कधी दुसरीकडचे काही पथदिवे सुरू करण्यात येते. दिवाळी नंतर काही दिवसापासुन तेही पथदिवे कन्हान शहरातील महामार्गाचे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असल्याने महामार्ग लगतच्या दुकान व घरात चोरी, लुटमार तसेच मोकाट जनावरांचा धुमाकुळ असुन रात्री रस्त्यावरच बसुन असल्याने सामोरून येणार्या वाहनाच्या प्रकाशाने वाहन चालकांना, पायदळी लोकांना काहीच दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाणात वाढ होऊन निर्दोष लोकांचा बळी जाण्याची दाट शक्यता निर्माण होत असल्याने महामार्गावरील पथदिवे कधी सुरु होणार ? असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे. करिता कन्हान शहरातील महामार्गावरील पथदिवे (स्ट्रीट लॉईट) पावसाळा सुरू होण्या अगोदर सुरू करण्याची मागणी नागरिकात जोर धरू लागली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …