*सावनेर शहरात फिरते कोरोना तपासणी केंद्र*
*बीनकामी रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची तपासणी सुरु*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया
सावनेर ः वढत्या कोरनाचे दुसर्या चरणाचे अनुभव व पुढे येणाऱ्या तीसर्या चरणाचे भाकीत नजरे पुढे ठेवत विनाकारण फिरताना दिसल्यास ऑन दि स्पॉट कोरोना टेस्ट केली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली आहे.
सर्वत्र कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची व कोरोना खबरदारी नियम मोडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता खबरदारीच्या उपाययोजना अधिकाधिक पध्दतीने वाढवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर अन्य तालुक्यात राबवण्यात येणारी ऑन दि स्पॉट कोरोना तपासणी सावनेर शहरात ही सुरू करण्यात आली आहे.
सदर मोहीमेत तात्काळ रॅपिड टेस्ट केली जाईल. तसेच आवश्यकतेनुसार आरटीपीसीआर टेस्टही केली जाईल. तसेच तपासणीत पाँझेटिव्ह निघणाऱ्यांना तात्काळ शासकीय औंधोगीक प्रशिक्षण केन्द्रातील कोवड सेंटर मधे दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहीती प्राथमिक आरोग्य केन्द्राचे प्रपाठक डॉ. पवन मेश्राम व डॉ डॉ. संदीप गुजर यांनी व तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरासोबतच अन्य भागात फिरते कोरोना तपासणी केंद्र अचानक व्हिजिट करून तपासणी करणार आहे. असे तहसीलदार सतीश मासाळ यांनी सांगितले.सोबतच वाढती रुग्णवाढ चिंता वाढवणारी होती परंतु सावनेर शहर व परिसरात रुग्णासंख्या मंदावली असली तरी खबरदारीच्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे. नागरिकांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करावी. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी कोरोना टेस्ट करुण घेणे सोबतच अत्यावश्यक वस्तु विक्रेता दुकानदार व त्यांचे कर्मचारी सोबतच फळ भाजी व इतर व्यवसाईक आदिंने वरच्यावर कोवीड 19 च्या टेस्ट तसेच आप-आपल्या प्रतिष्ठानात सोशल डिस्टंन्सीग, सेनीटायझर, मास्क सोबतच कोवीड 19 च्या दिशानिर्देशाचे काटेकोर पणे पालध करणे बंधनकारक असल्याचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले तसेच जे दुकानदार कोवीड 19 च्या दिशानिर्देशाचे पालन करतांना आढळणार नाहीत त्यांना आर्थिक दंडात्मक कारवाईस पुढे जावे लागेल असा ठाम इशारा याप्रसंगी बोलताना दीला.
*आज झालेल्या आकस्मिक मोबाईल व्हँन तपासणीत गांधी चौक येथे 115 लोकांच्या तपासणीत एक रुग्ण पाँझेटिव्ह आढळला तर जयस्तंभ बाजार चौक येथे 48 तपासणीत शुन्य व कोविड तपासणी केन्द्रातील 150 तपासणीतून आठ रुग्ण पाँझेटिव्ह निघाल्याची माहीती डॉ. संदीप गुजर यांनी दीली*