*नरखेड ग्रामीण रुग्णालय येथे परिचारीका दिन साजरा*

*कोरोना योध्दा परिचारिका यांच्या सत्कार*
नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड – कोरोना संकटात स्वतःच्या कुटूंबाची जबाबदारी पार पाडून आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परीचारीका भगिनींना जागतिक परीचारीका दिनानिमित्त” जन सेवा संस्था तर्फे नरखेड ग्रामीण रुग्णालय येथील परिचारिका ८ भगिनींनी च्या सत्कार करणेत आला
रजनी लोखंडे,मीनाक्षी देशपांडे,मेघा हुलके,भाग्यश्री यादव,काजल पाटील,मयुरी बोरकर,सुनीता राठोड,मालती सिंदडाम ,

या सर्वाना सन्मानपत्र व फेसशील्ड देवुन सत्कार करण्यात आला तथा मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्य वर म्हणून जन सेवा संस्था प्रमुख सुरेश शेंदरे,नगरसेवक न प. नरखेड सुधाकर ढोके, स्वामी विवेकानंद केंद्र प्रमुख दिपक ढोमने,अनिल अलोने,विजय दातीर,ठाकुरदास अरखेल,सतीश टेकाडे, प्रकाश सनेसर,दिपक बेहरे,उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज