*शिवहोम तंत्र श्री राजेश्वरी आश्रम शरभ गाव परसोडी चे आध्यात्मिक धर्मगुरू राजकुमार बसवार उपाख्य (गुरुजी )व आश्रम च्या संचालीका गुरुमाऊली दिप्ती ताई यांच्या तर्फे प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर ला रुग्ण, परिचारिका व डाँक्टरांना उपचारासाठी उपयुक्त असे जवळपास अडीच लाखाचे साहित्य मा.उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,जिल्हापरिषद नागपुर चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केन्द्राचे प्रपाठक पवन मेश्राम यांच्या स्वाधीन करण्यात आले*

*शिवहोम तंत्र श्री राजेश्वरी आश्रम शरभ गाव परसोडी चे आध्यात्मिक धर्मगुरू राजकुमार बसवार उपाख्य (गुरुजी )व आश्रम च्या संचालीका गुरुमाऊली दिप्ती ताई यांच्या तर्फे प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर ला रुग्ण, परिचारिका व डाँक्टरांना उपचारासाठी उपयुक्त असे जवळपास अडीच लाखाचे साहित्य मा.उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,जिल्हापरिषद नागपुर चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केन्द्राचे प्रपाठक पवन मेश्राम यांच्या स्वाधीन करण्यात आले*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया

सावनेर – तालुक्यातील परसोडी नजीकच्या शरभ गावालागत असलेल्या शिवहोम तंत्र श्री आश्रमाचे संचालक आध्यात्मिक धर्मगुरू राजकुमार बसवार व गुरुमाऊली दिप्ती ताई यांच्या संकल्पनेतुन शासकीय प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर ला डाँक्टर, परिचारिक,रुग्ण तसेच रुग्णालयाला अत्याआवश्यक असलेले दोन जंबो आँक्सीजन ट्राँली,सहा व्हिल चेअर, आठ स्टेस्थोस्कोप,एक पल्स आँक्सीमीटर,एक फीटल डाँपलस,चार रक्तचाप माप यंत्र,एक मेडिकल ट्राँली व वीस प्लास्टिक चेअर असे अंदाजे अडीच लाखाचे जवळपास चे साहीत्य आश्रमाचे वतीने दान करण्यात आले.

वाढत्या कोरोना काळात विशेषतः कोरोना लागन झालेल्या रुग्णांना हातळतांना डाँक्टर, नर्स व स्टाफला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अश्यात रुग्णांच्या परिवारातील कोणीही सहकार्य करण्याच्या भुमीकेत नसतो व सर्व तान हा स्टाप वर पडतो परंतू आश्रमातुन मीळालेल्या या भेट वस्तुमुळे नक्कीच या कर्मचाऱ्यांचा तिण कमी होईल असे विचार याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी व्यक्त केले.

तर जिल्हापरिषद नागपूर चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी याप्रसंगी आपले विचार मांडत सर्वप्रथम आध्यात्मिक धर्मगुरू व गुरुमाऊलीचे आभार मानत म्हटले की गुरुजी राजकुमार बसवार यांची जन्मभूमी व कार्यक्षेत्र जरी सावनेर असले तरी त्यांचे अनुयायी संपूर्ण देश विदेशात आहेत व प्रत्येक समाजकार्यात गुरुजी जातीने पुढाकार घेतात या कोरोना संक्रमण काळात राजेश्वरी आश्रामातचन मीळालेल्या या साहित्यांचा प्राथमिक आरोग्य केन्द्राला तर लाभ होईलच सोबत रुग्णांना व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील शारीरिक तान कमी होण्यास मदत मीळेल असे मत व्यक्त केले.

तर याप्रसंगी आपले विचार व्यक्त करत आध्यात्मिक धर्मगुरू राजकुमार बसवार यांनी म्हटले की दान केल्याने धन कधीही कमी होत नाही आणी आपण केलेले दान लोकांच्या उपयोगात येणे व त्याचा उपभोग गोरगरिबांना व्हावा हीच खरी ईश्वर सेवा आहे तर गुरुमाऊली दिप्ती ताई यांनी उपस्थितीत मान्यवरांना विनंती केली की पुढे भविष्यात ही आश्रमाचे दान कार्य निरंतर सुरू राहणार आपणास लागणारे साहीत्य उपलब्ध करुन देण्यासाठी परमेश्वराच्या कु्पेने आम्ही सदैव तत्पर राहू असे आश्वस्त केले.

*कार्यक्रमाचे संचालन माजी नगर सेवक व समाजसेवी डोमासाव सावजी यांनी तर प्रास्ताविक अँड शैलेश जैन व आभार प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे प्रपाठक डॉ. पवन मेश्राम यांनी मानले*

*याप्रसंगी पंचायत समीती सावनेर च्या सभापती सौ.शींदे, उपसभापती,जिल्हा परिषद सदस्या ज्योती सिरसकर,पंचायत समिती सदस्या सौ केसरे,विस्तार अधिकारी अनिल नागने,माजी नगरसेवक विजय बसवार, प्रा.साहेबराव विरखरे,केळवद पो.स्टे.चे एपीआय अर्जुन राठोर, नगरसेवक निलेश पटे,दिपक बसवार, अँड शर्मा,दिलीप जैन,सुधीर माटे,प्रा.आरोग्य केंन्द्र सावनेर चे डॉ. अक्षय कोल्हे,डॉ. मनजीत,घनश्याम तुर्के रामकुमार बसवार, वंदना बसवार,सह आश्रमातील सर्व मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …