Breaking News

*गळा चिरून हत्येचा प्रयत्न*

*गळा चिरून हत्येचा प्रयत्न*

 

विशेष क्राइम रिपोर्टर

हिंगणा – राहत्या घरीच ३३ वर्षीय युवकाची धारदार चाकूने गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारच्या (१२)रात्रीदरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजीवनगर येथे घडली. या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव सम्राट विजय सिंग (वय ३३)रा राजीवनगर असून त्याच्यावर डिंगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे.या घटनेत फिर्यादी त्याचे वडील विजय विश्वनाथ सिंग यांनी आज सकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानुसार जखमी सम्राट हा त्याचा मित्र प्रदीप उर्फ बच्चंन सिंग याला बुधवारी घरी आणले त्यांनी सोबत दारू आणली होती रात्री उशिरापर्यंत हे दोघेही घरातील मागच्या खोलीत दारू पीत बसले होते. वडील विजय ह्यांनी त्यांना अंडाभुर्जी सुद्धा बनवून दिली .रात्री फिर्यादी झोपी गेले तेव्हा पर्यंत दोघे मित्र दारू पीत होते. गुरुवारी सकाळी ६:३० वाजता विजय झोपून उठला व सम्राट च्या खोलीत गेला तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात होता त्यानी याबाबत एमआयडीसी पोलिसांना सूचना दिली व जखमीला उपचारासाठी लता मंगेशकर रुग्णालयात नेले. एमआयडीसी पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. एकंदरीत हा सर्व प्रकार संशयास्पद असून पोलीस रात्री त्याच्याबरोबर दारु पीत असलेल्या मित्र प्रदीप चा शोध घेत आहेत. जखमी सम्राट अद्याप बोलु शकत नाही त्यामुळे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …