Breaking News

*वणी येथील गिमा टेक्सटाईल कामगाराचा अपघाती मु्त्यू*

*वणी येथील गिमा टेक्सटाईल कामगाराचा अपघाती मु्त्यू*

हिंगणघाट प्रतिनिधी – भाऊराव कोटकर

हिंगणघाट – काम करत असलेला कामगार आकाश मोरेश्वर मुन हा पायदळ कामाला जात असताना कंपनीसमोरून भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.


ही बातमी सकाळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे त्यांच्या घरी जाऊन कामगारांनी दिली त्यावेळी तातडीने माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी घटना स्थळी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबत मागणी केली व मागणी पूर्ण होई पर्यंत संपूर्ण कंपनी बंद केली व आर्थिक मदत देण्यास भाग पाडले व त्यानंतर गिमा टॅक्स कंपनी मार्फत ०५ लाख रुपयाचा चेक पीडित कुटुंबाला उपविभागीय कार्यालय मध्ये देण्यात आला त्यावेळी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे, आमदार समीर कुणावार, सुधीर कोठारी ,आफताब खान, एसडीओ चंद्रभानजी खंडाईत ,तहसीलदार श्रीरामजी मुंधडा ,ठाणेदार संपदजी चव्हाण ,गिमा टॅक्सचे पठाण व कामगार इत्यादी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …