Breaking News

*परिवेक्षाधीन पो. उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर चा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार*

*परिवेक्षाधीन पो. उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर चा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात मोठया प्रमाणात अवैध धंदे सुरु असतांना मागील एक ते दिड महिन्यासाठी कन्हान पोलीस स्टेशन ला आलेले परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी अवैध धंध्या वर कारवाई करित अवैध रेती, कोळसा चोरी, अवैध दारु विक्री व ईतर अवैद्य धंदे बंद करित शहरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवल्याने शांती सुव्यवस्था कायम करून उत्कृष्ट कन्हान थानेदारांचे कार्य केल्याने मा.श्री सुजितकुमार क्षीरसागर यांचे सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी कौतुक करून सत्कार केला.

बुधवार (दि.१२) ला परिवेक्षाधिन पोलीस उपअधीक्षक मा.श्री सुजितकुमार क्षीरसागर साहेब यांनी कन्हान थानेदार म्हणुन उत्कृष्ट कार्य करित परिवेक्षाधिन पुर्ण करून स्थलांतर झाल्याने कन्हान शहराला दिलेल्या त्यांच्या अविस्मरणीय आठवणी, या अल्पशा कार्यकाळात खाकी वर्दीची खरी जवाबदारी, ओळख व प्रामाणिक कर्तव्य करून कन्हान शहराला एक प्रखर ओळख दिली. या खंभीर व अनुशासनात्मक कार्यकिर्दीचे औचित्य साधुन कन्हान चे सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी पुष्पगुच्छ सत्कार केला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …