*कन्हान शहरात घरच्या घरी रमजान ईद साजरी* *रमजान ईद निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे मुस्लिम बांधवांना वृक्ष व गुलाबाचे फुल भेट*

*कन्हान शहरात घरच्या घरी रमजान ईद साजरी*

*रमजान ईद निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे मुस्लिम बांधवांना वृक्ष व गुलाबाचे फुल भेट*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात दरवर्षी रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते . परंतु यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी घरच्याघरी अत्यंत साधेपणाने रमजान ईद साजरी करण्यात आल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मुस्लिम बांधवांकडे जाऊन वृक्ष व गुलाबाचे फुल देऊन रमजान ईद च्या शुभेच्छा देत ईद उत्सव साजरा केला .
शुक्रवार दिनांक.१४ मे २०२१ ला रमजान ईद निमित्य कन्हान शहरात मुस्लिम बांधवांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करता शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करीत मस्जिद मध्ये जास्त गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करून सार्वजनिक नमाज करण्यात आला. मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र असतो. मात्र कोरोनामुळे संपुर्ण रमजान महिन्याभर घरीच राहुन नमाज करण्यात आले. रमजान ईदच्या दिवशी सामुहिक नमाज करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात . परंतु यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी शासनाच्या नियमावली चे काठेकोरपणे पालन करून घरच्याघरीच अत्यंत साधेपणाने रमजान ईद साजरी करण्यात आली. रमजान ईद निमित्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यानी मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांचे हस्ते पोलीस उपविभागीय कामठी कार्यालय कन्हान येथे पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्तार बागवान यांना बदामाचे वृक्ष देऊनं ईद च्या शुभेच्छा दिल्या. तसेच मुस्लिम बांधवांच्या घरोघरी जाऊन गुलाबाचे फुल भेट देऊन रमजान ईद च्या शुभेच्छा देत रमजान ईद उत्साहात साजरी केली.

याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, शाहरुख खान, रजनिश मेश्राम सह आदि मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या रमजान ईद निमित्य शहरात शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणुन पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …