Breaking News

*तेजस संस्थे द्वारे रंजनिश मेश्राम चा सत्कार*

*तेजस संस्थे द्वारे रंजनिश मेश्राम चा सत्कार*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – हितज्योती आधार फाऊंडेशन चे हितेश बन्सोड च्या सहकार्याने कन्हान पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या भटकलेल्या मनोरूग्ण महिलेस मदत करून आधार मिळवुन देणार्या कन्हान चा सामाजिक कार्यकर्ता रंजनिश मेश्राम या युवकाचा तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी द्वारे सत्कार करण्यात आला.


कन्हान पोलीस स्टेशन ला लागुन असलेल्या शिवपंचायत हनुमान मंदिर परिसरात एका महिन्यापासुन असलेली निराधार मनोरूग्ण महिलेस बघुन सामाजिक कार्यकर्ता रंजनिश (बाळा) मेश्राम यांनी ती तुमसर देवाळी ची असल्यांची खात्रीशीर माहिती काढल्या नंतर हितज्योती आधार फाऊंडेशन सावनेर चे हितेशदादा बन्सोड यांच्या सहकार्याने कन्हान पोलीस स्टेशन ला महिलेस योग्य आधार देण्याचे लेखी लिहुन देऊन तिला सावनेर ला नेऊन तिची परिस्थिती व्यवस्थित करून तिला कायम स्वरूपी सेवा संकल्प आश्रम बुलढाणा येथे ठेवण्याची व्यवस्था करून तिला चांगला आधार उपलब्ध करून दिला. या मनोरूग्ण महिलेच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ता रंजनिश वामन मेश्राम यांनी हितेश बन्सोड च्या सहकार्याने मानवदुताचे मौलिक कार्य केल्याबद्दल तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी द्वारे रविवार दिनांक १६ मे २०२१ ला दुपारी ११:३० वाजता शिवपंचायत हनुमान मंदिर परिसर गांधी चौक कन्हान येथे हितेश दादा बन्सोड व रंजनीश मेश्राम यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास हितेश दादा बन्सोड महत्वाच्या कामामुळे उपस्थित राहु शकले नसल्याने तेजस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, पत्रकार कमलसिंग यादव, कन्हान – कांद्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरेशी, संस्था उपाध्यक्ष देविदास पेटारे आदीच्या हस्ते मौलिक मदत कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता रंजनिश (बाळा ) मेश्राम या मानवदुत युवकाचा शाल श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार अब्दुल काशिफ, युवा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता ऋृषभ बावनकर, सतिश ढबाले, महेश ढोंगळे, संस्थेचे मिस्बाहऊर रहमान, नरेश शिंदे, ट्रेनीज अभय पेटारे, सौरभ पात्रे, रजनी खंडारे, नागपुरच्या सुनीता ताई सह आदि उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …