Breaking News

*कन्हान डोणेकर सभागृह येथे कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ* *सामाजिक कार्यकत्यासह , संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चे डायरेक्टर सौ.शीतल मुकेश चौधरी व डायरेक्टर तुषार फडणवीस यांचा प्रयत्नाला मिळाले यश*

*कन्हान डोणेकर सभागृह येथे कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ*

*सामाजिक कार्यकत्यासह , संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चे डायरेक्टर सौ.शीतल मुकेश चौधरी व डायरेक्टर तुषार फडणवीस यांचा प्रयत्नाला मिळाले यश*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन शहरात गोरगरीबांना पाहिजे तशी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांनी संबंधित अधिकार्याशी चर्चा करून कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली असता सोमवार दिनांक .१७ ला डोणेकर सभागृह कन्हान येथे नप नगराध्यक्ष करूणाताई आष्टणकर, मनोनीत नगरसेवक नरेश बर्वे यांचा हस्ते व पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ करण्यात आला.


कन्हान शहर व परिसरात कोरोना च्या दुस-या लाटीमुळे गोर गरिबांना चांगलाच त्रास सहन करावा लागला असुन कित्येक तरी लोकांना योग्य उपचार न मिळाल्याने आणि कन्हान पासुन नागपुर चे अंतर दुर असल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्या अगोदर कित्येक तरी लोकांचा मृत्यु झाला.

कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहातल्या काही सामाजिक कार्यकत्यासह , संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चे डायरेक्टर सौ.शीतल मुकेश चौधरी व डायरेक्टर तुषार फडणवीस यांचा प्रयत्नाने सोमवार दिनांक .१७ मे २०२१ ला दुपारी १२ वाजता नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील विजय मॉर्केट येथील डोणेकर सभागृह येथे कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. करूणाताई आष्टणकर, नामनिर्देशित नगरसेवक नरेश बर्वे यांचा हस्ते व कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा उपस्थितीत संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ करण्यात आला. या कोविडालायात १० ऑक्सिजन युक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली असुन डॉक्टर वसीम हुसैन व डॉ. सुष्मीता शाहु यांच्या देखरेखीत हे कोविडालाय सुरू राहणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे , कन्हान-पिपरी नगरपरिषदे चे नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे, माजी नगरसेवक अजय लोंढे, उदयसिंह उर्फ गज्जु यादव, आकीब सिद्धिकी, प्रविण गोडे, ॠषभ बावनकर, सौरभ डोणेकर , शुभम चौधरी, रोहित बर्वे सह आदि नागरिक उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …