Breaking News

*डांबरीकरण रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर, गावातील लोकानां कंत्राट दाराच्या धमक्या* *उपसरपंचासह गावातील लोकानी केला आरोप*

*डांबरीकरण रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर, गावातील लोकानां कंत्राट दाराच्या धमक्या*

 

*उपसरपंचासह गावातील लोकानी केला आरोप*

देवरी प्रतिनिधी – शैलेश राजनकर

देवरी:-देवरी तालुक्यातील शिरपुर ग्रामपंचायत हद्दीतील कुभांरटोला गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ०६ ते कुभांरटोला सुमारे दिड किलोमीटर असलेल्या डांबरीकरण रसत्याचे भुमीपुजन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरटे यांच्या हस्ते सरपंच नितेश भेंडारकर शिरपूर ग्रापंचायत, सरपंच लखनलाल पंधरे भर्रेगाव व शिरपुर-कुभांरटोला गावातील लोकांच्या उपस्थीत दि. १८ मार्च २०२१ रोजी पार पाडण्यात आले व दि. १० मे २०२१ रोजी डांबरीकरणाच्या रस्त्याला कामाला संबधीत ठेकेदाराकडुन सुरु करण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवसी संबधीत ठेकेदार डाबंरीकरणाच्या रस्त्याला निक्रुष्ट साहीत्याचा वापर करत असल्याचे गावातील लोकानां निदर्शनात आल्याने कुभांरटोला गावातील लोकानीं काम बंद करण्याची मागणी केली आहे.

देवरी तालुक्यातील शिरपुर ते कुभांरटोला गावातीर दिड किलोमीटर डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम पाच दिवसा पासुन सुरु आहे. मात्र, करण्यात येत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी भर्रेगावचे उपसरपंच, कुभांरटोला गावातील धनेश नंदलाल बारसे, रोहित शिवनकर, शिताराम सलामे, रामु संपीं, सनत भालचंद गुड्डी, देवेश्री राजु निनावे व कुभांरटोला गावातील नागरीकानीं केली आहे. काम सुुरु असतानी संबधित अभियंता या होत सुुरु असलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या बांधकामाकडे आलेच नसल्याचे गावकर्याचे म्हणने आहे. उलट संबधीत ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना हाताशी धरून या बांधकामामध्ये खडीकरण तसेच मुरुमाचा वापर हा अत्यल्प आहे. सदर बांधकाम सुरु असताना निक्रुष्ट साहीत्याचा वापर डांबरीकरण रस्त्याच्या बांधकामात सुरु असल्याने, शासनाच्या फंडाच्या (मुख्यमंत्री ग्राम सडक योजना) ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने दुरुपयोग होत आहे. बांधकाम त्वरीत थांबवून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी कुभांरटोला गावातील लोकानीं केली आहे.

शिरपुर ते कुभांरटोला या डाबंरीकरन रस्ता बांधका कामाचे भूमिपूजन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरेटे यांच्या हस्ते दोन महिन्या अगोदर झाले. कामाला प्रत्यक्षात सुरुवात मागील आठवड्यात झालेले असून सुरुवातीपासूनच या कामामध्ये साहित्याचा वापर हा अत्यंत सुमार(निक्रुष्ट) दर्जाचा असल्यामुळे गावकऱ्यांनी या कामाला विरोधसुद्धा केला. ठेकेदारांने गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता विभागातील कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता यांना हाताशी धरून काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी अधिक वेगळे केले आहे. परंतु तरीही निकृष्ट असे काम सुरुच ठेवलेले आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळेच ठेकेदार निर्ठावलेले आहेत. त्यांच्या कामांची त्वरीत चौकशी होणे गरजेचे असल्याचे कुभांरटोला गावातील लोकांचे बोलने आहे.

कुभांरटोला गावातील लोकानी आरोप केले आहे की, संबधित ठेकेदाराने बोर्डावर होत असलेले डाबंरीकरनाच्या रसत्याचे बांधकाम कीती रुपयाचे आहे हे ही लीहलेले नसल्याने गावातील लोकाकडुन सदर कामासंदर्भात आक्षेप घेतल्या जात आहेत. व संबधित ठेकेदार व अभियंताच्या हातमिळवणीमुळे शिरपुर ते कुभांरटोला व तालुक्यात होत असलेल्या निक्रुष्ट दर्जाच्या अशाच रस्ता बांधकाम वृत्तीमुळे तालुक्यातील ग्रामीन क्षेत्रातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. कुभांरटोला गावातील लोकानीं सदर काम त्वरित बंद करून कामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

*कोट*:- आमच्या गावामध्ये डाबंरीकर रसत्याचे काम सुरु असुन हे काम कुंभारटोला ते शिरपुर पर्यंत आहे. हे काम उमा कंन्ट्रक्शन ह्या कंपनिला मिळाला असुन येथिल सर्व गावकरी लोकांचे या होत असलेल्या निक्रुष्ट रस्ता बांधकामाबद्दल विरोध आहे. त्यात हे डांबरीकरनाचे काम किती रुपयाचे आहे ते निर्देशीत बोर्डवर लिहलेेले नाही, हे होत असलेले काम निक्रुष्ट दर्जाचे होत आहे, निक्रुष्ट दर्जाची गीट्टी वापरली जात आहे. व सदर ठेकेदार यानां या निक्रुष्ट कामाबद्दल बोलले असता त्याने गावकर्यानांच “जे तुम्हाला जमते ते तुम्ही करुन घ्या” अशी धमकी देतो व काम बंद करायला सांगीतले तरी काम बंद केला नसल्याने या कामाचा व ठेकेदाराचा गावपातळीवर सगळ्यांनी विरोध केला आहे.
*धनेश बारसे* गावकरी,कुभांरटोला

*कोट*:- शिरपुर ते कुभांरटोला डाबंरीकरन रस्ता बांधकामा संदर्भात कालच माझा संबधीत ठेकेदारासी बोलना झालेला आहे. मी बाहेर असल्यामुळे सदर जागेवर गेलो नाही पंरतु ऊद्या त्या जागेवर जाऊन कामाची चौकसी करुन ते काम दिलेल्या ईस्टीमेट नुसार होत नसेल व लोकांना त्रास दायक असेल तर काम बंद करुन चौकसी करण्यात येईल.
*लांजेवार* J.E.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …