*निटासी पावती भरुण देण्याचे पैसे घेतात बँक कर्मचारी*
वरोरा प्रतिनिधी – मुजम्मील शेख
वरोरा – तालुक्यातील चिमूर महामार्गावर वसलेल्या शेगाव बुद्रुक या गावातील जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये शेगाव गावालगत असलेल्या ग्रामीण गावातील नागरिक पैशासंबंधी कामाकरिता या गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत रुपयांचे नियंत्रण करण्याकरिता येत असतात तर बहुतांश ग्रामीण भागातील नागरिक अशिक्षित असल्याने व कोणी सुशिक्षित असला तरी वेळेवर त्याच्याजवळ प्रिंट नसल्याचे कारण समोर आल्यावर या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शिपाई बँकेच्या खासगी कामाकरिता सुरक्षेकरिता व बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षे करिता नियुक्त असतो, हे आपणा सर्वांना माहीत आहे परंतु या बँकेमध्ये सर्रासपणे अज्ञात अशिक्षित गोरगरीब वयोवृद्ध नागरिकाकडून येथील बँक कर्मचारी विड्रॉल पावती भरण्याचे म्हणजे व पैसे काढण्याचे फार्म किंवा पैसे भरण्याचा अर्ज व इतर संबंधित कार्य करिता लागणारी कागदपत्रे भरून देण्याकरिता वेगवेगळे रेट नुसार पैसे घेत असल्याच्या निदर्शनास आले.

सध्या देशामध्ये कोरोना चे सावट सर्वत्र पसरले असतानासुद्धा राज्य व केंद्र शासनाकडून गोरगरीब मजुरांसाठी व नागरिकांकरिता शासनाकडून मदत पुरविली जात आहे त्याच अनुषंगाने नागरिक व वयोवृद्ध नागरिक यांना मासिक निराधार योजनेअंतर्गत पेन्शन व मानधन मिळत असतात याच मानधन व पेन्शनच्या पैशाने आपला उदरनिर्वाह चालवी याकरिता वयोवृद्ध नागरिक जिल्हा मध्यवर्ती बँक शेगाव येथे पैसे काढण्यास व टाकण्यात येत असतात याचा गैरफायदा घेत या बँकेतील सदर कर्मचारी हा एक अर्ज भरून देण्याकरिता प्रति दहा रुपये घेतो तर या बँकेमध्ये आज मी तिला रोज कित्येक नागरिक येत असतात प्रहार पेपर दिवसभरात दोनशे नागरिकांचीही फार्म भरून दिले तर दोन हजार रुपये सर्रास हा कर्मचारी असल्याचा प्रकार निदर्शनास आला. मजबुरीचा फायदा घेऊन आपले खिसे गरम करू पाहणाऱ्या या सुरक्षा रक्षकावर बँक प्रशासन कोणती कारवाई करते याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे सदर चित्र पाहिले असता या कर्मचाऱ्याला तात्काळ सेवानिवृत्त करा अशी मागणी शेगाववासी करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज