Breaking News

*गरजूंना एक हात मदतीचा* *सुधीरबाबु कोठारी यांच्या तर्फे हिंगणघाट शहरातील नाभिक समाजातील गरजवंताला किराणा सामान किटचे वाटप*

*गरजूंना एक हात मदतीचा*

*सुधीरबाबु कोठारी यांच्या तर्फे हिंगणघाट शहरातील नाभिक समाजातील गरजवंताला किराणा सामान किटचे वाटप*

हिंगणघाट प्रतिनीधी :- भाऊराव कोटकर

हिंगणघाट – गरजूंना एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत मा.श्री. सुधीरबाबु कोठारी यांच्या तर्फे हिंगणघाट शहरातील नाभिक समाजातील गरजवंताला किराणा सामान किटचे वाटत करण्यात आले.

ज्यांचे लाॅकडाऊन मुळे व्यवसाय बंद असल्याने त्याची अवहेलना सुरु झाली होती. त्याबाबत नाभीक समाजातील एक सदस्य श्री राम अंबरवेले यांनी उध्दभवलेल्या परिस्थितीमुळे आर्थिक मदतीची गरज आहे अशी पोस्ट केली होती.

त्यावर प्रतीउत्तरार्थ सुधीरबाबु कोठारी यांनी संपर्क साधावा नख्खीच मदत करु असे प्रतिपादन केले होते. आणि त्यांनी ते लगेच ३० गरीब व गरजू कुटुंबातील नागरीकांना जिवनाश्यक वस्तुंचे (किराणा माल किट) घेऊन दिले त्यामुळे गोरगरिबांच्या चेहर्यावर स्मित हास्य उमटले आहे.
सुधिरबाबुजी कोठारी यांचे नाविसमाजाचे श्री हरीभाऊजी मांडवकरजी ,प्रफुल क्षिरसागरजी,श्री राम अंबरवेलेजी व ईतर समाज बांधवानी श्री सुधीरबाबु कोठारी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …