Breaking News

*३१ मार्च पुर्वी च्या सर्व पंजीबद्ध बांधकाम कामगारांना लाभ देण्याची मागणी* *आमदार टेकचंद सावरकर यांचे कामगार आयुक्तांना निवेदन*

*३१ मार्च पुर्वी च्या सर्व पंजीबद्ध बांधकाम कामगारांना लाभ देण्याची मागणी*

*आमदार टेकचंद सावरकर यांचे कामगार आयुक्तांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी / कन्हान – कोरोना महामारी मुळे राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला असुन या लॉकडाऊन मुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या बांधकाम कामगारांना दिड हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे . परंतु मोठया संख्येने बांधकाम कामगार अद्यापही दिड हजार रुपयांच्या अनुदाना पासून वंचीत असल्यामुळे भाजपा कामठी शहर च्या पदाधिकार्यांनी आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वात बांधकाम महामंडळ चे कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांची भेट घेऊन व त्यांना एक निवेदन देऊन ३१ मार्च २०२१ पर्यंत पंजीबद्ध असलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या खात्यात दिड हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे .
बांधकाम महामंडळ द्वारे बांधकाम कामगारांचे ऑनलाईन फॉर्म स्विकारण्यात आले,परंतु ऑनलाईन फॉर्म ची डाटा एंन्ट्री अजून ही मुंबई मुख्यालयात पाठविण्यात आली नाही


त्यामुळे बांधकाम कामगारांना अद्यापही अनुदानाचा किंवा ईतर कोणताही लाभ भेटू शकला नाही . दरम्यान आमदार टेकचंद सावरकर यांनी सर्व बांधकाम कामगारांचा डाटा एंन्ट्री नागपूर बांधकाम महामंडळात करण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह करण्याची मागणी देखील यावेळी केली आहे .

या प्रसंगी भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया, कामठी नगर परिषद विपक्ष नेता लालसिंग यादव, महामंत्री उज्वल रायबोले, सुनील खानवानी , राजकुमार हडोती , विनोद संगेवार , सतिश जैस्वाल , प्रमोद वर्णम ,अजय पाचोली , नगरसेवक प्रतिक पडोळे , नगरसेवक राजू पोलकमवार यांचा समावेश होता .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …