Breaking News

*वराडा शिवारात एका आरोपी ने महिलेचा केला विनयभंग* *फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

*वराडा शिवारात एका आरोपी ने महिलेचा केला विनयभंग*

*फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान :- कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वराडा शिवारात एका आरोपी ने महिलेचा विनयभंग केल्याने फिर्यादी महिला ने गुरुवार दिनांक २० मे ला कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध तक्रार टाकले असता कन्हान पोलीसांनी फिर्यादी महिलेचा तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी महिला व आरोपी ईश्वर बाळकृष्ण घोडमारे हे दोघही एकमेकांच्या घराच्या बाजुला राहत असुन मंगळवार दिनांक १८ मे २०२१ ला मध्यरात्री ०२:३० वाजता सुमारास फिर्यादी महिला ही आपले घराच्या बाजुला बाथरुम मध्ये गेली असता आरोपी ईश्वर बाळकृष्ण घोडमारे वय ३५ वर्ष राहणार वराडा हा मागुन येऊन फिर्यादी महिलेच्या अंगावर आला व फिर्यादी महिलेचा हात पकडुन असता फिर्यादी महिले ने आरडा ओरड केली असता फिर्यादी महिले च्या नातेवाईकांना पाहुन आरोपी ईश्वर बाळकृष्ण घोडमारे हा पडुन गेला . सदर आरोपी ईश्वर बाळकृष्ण घोडमारे याने फिर्यादी महिले सोबत विनयभंग करुन बदनामी केल्याने फिर्यादी महिले च्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी ईश्वर बाळकृष्ण घोडमारे विरुद्ध कलम ३५४(अ) तहत गुन्हा दाखल करुन आरोपी ईश्वर बाळकृष्ण घोडमारे ला सुचना पत्र देऊन सोडण्यात आले . सदर घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात बिट जमादार जियालाल सहारे व विरेंन्द्र सिंग चौधरी पुढील तपास करीत आहे .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …