*कन्हान येथे विविध संघटने द्वारे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांना अभिवादन*
*नगरपरिषद कार्यालय कन्हान , काॅंग्रेस सेवा दल स्वास्थ्य सेवा समिति, नागपुर , काॅंग्रेस पार्टी कन्हान , सार्वजनिक वाचनालय , कन्हान द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे विविध संघटने द्वारे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
*नागपूर जिल्हा काॅंग्रेस सेवा दल स्वाथ सेवा समिती द्वारे मास्क वाटप*
कन्हान – नागपूर जिल्हा काॅंग्रेस सेवा दल स्वाथ सेवा समिती द्वारे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नाका नंबर सात येथे करुन माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत नागरिकांना मास्क वाटप करुन पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
शुक्रवार दिनांक २१ मे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य नागपूर जिल्हा काॅंग्रेस सेवा दल स्वाथ सेवा समिती द्वारे कार्यक्रमाचे आयोजन नाका नंबर सात येथे करण्यात आले असुन नागपूर जिल्हा काॅंग्रेस सेवा दल स्वाथ सेवा समिती अध्यक्ष शुभांगी प्रकाश बोंद्रे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर अध्यक्ष राजेश यादव , नागपूर जिल्हा किसान काँगेस अध्यक्ष ओमप्रकाश काकडे , व डॉ प्रकाश बोंद्रे यांनी माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांचा जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थितांनी माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले असुन नागरिकांना मास्क वाटप करीत श्री राजीव गांधी यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली . या प्रसंगी पंकज गजभिये , रवी रंगजी, अमोल प्रसाद , धर्मपाल बागडे, प्रमोद बांते,अविनाश रायपुरे,अकिब सिद्दीकी,मुकेश ऊके,सह आदि काॅंग्रेस पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
*कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय , कन्हान*
कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे माजी प्रधानमंत्री श्री राजीव गांधी यांचा पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
शुक्रवार दिनांक २१ मे २०२१ माजी प्रधानमंत्री श्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे यांनी श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता काॅंग्रेस पदाधिकार्यांनी व नागरिकांनी श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत राजीव गांधी यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी माजी नप उपाध्यक्ष योगेंन्द्र रंगारी , नगरसेविका रेखा टोहणे , गुंफा तिडके , पुष्पा कावडकर , नगर सेवक विनय यादव , प्रदिप बावने ,अक्षय कारेमोरे , चंदन मेश्राम अशोक पटिल सह आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .
*काॅंगेस पार्टी कन्हान शहर*
कन्हान – काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर द्वारे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक काॅंग्रेस कार्यालय येथे करण्यात आले असुन माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत लहान मुलांना व नागरिकांना फळ , मास्क , व खाद्य सामग्री वाटप करुन पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
शुक्रवार दिनांक २१ मे २०२१ माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर द्वारे गांधी चौक काॅंग्रेस कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला शहर अध्यक्ष राजेश यादव यांनी पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता उपस्थितांनी माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .या प्रसंगी लहान मुलांना व नागरिकांना फळ , मास्क , व खाद्य सामग्री वाटप करुन माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .

*सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर,कन्हान*
कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य कोरोना काळातील शासनाच्या नियमाचे पालन करून माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांचा प्रतिमेस पुष्प हार व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
शुक्रवार (दि.२१) मे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमित्य सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक शासनाच्या नियमाचे पालन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष नत्थुजी खानजोडे , प्रमुख अतिथी गंगाधरराव अवचट यांच्या हस्ते माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता उपस्थितांनी माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून व दोन मिंनटाचे मौन धारण करून भावपुर्ण श्रद्धांजली देत अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांचे तापमान व ऑक्सीजन लेवल तपासण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष नत्थुजी खानजोडे, अतिथी गंगाधरराव अवचट,पदमाकर रायपुरकर , पत्रकार कमल सिंह यादव , सचिव मनोहर कोल्हे, कोषाध्यक्ष दिनकरराव मस्के, गजेंन्द्र गिरडकर, संध्या सुर्यवंशी , , अल्काताई कोल्हे , सोनाली सुर्यंवशी , श्याम बारई ग्रंथपाल , अविनाश कोल्हे , कृणाल कोल्हे सह आदि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कोषाध्यक्ष दिनकरराव मस्के यांनी केले तर आभार श्याम बारई ग्रंथपाल यांनी व्यकत केले .
Maharashtra News Media सच की आवाज