*कन्हान येथील दोन साल मशीन चोरी*

*फिर्यादी गं.भा अल्काताई मनोज काकडे यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत एक किलोमीटर अंतरावरील तारसा रोड हनुमान नगर कन्हान, श्री कृष्णराव लाॅन च्या समोर फिर्यादी गं.भा अल्काताई मनोज काकडे यांची ४० वर्ष जुनी साल मशीन अज्ञात चोरट्यांनी २ साल मशीन चोरून नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार कन्हान तारसा रोड श्री कृष्णराव लाॅन च्या समोर हनुमान नगर कन्हान येथे फिर्यादी माजी सरपंचा गं.भा अल्काताई मनोज काकडे वय ४२ वर्ष राहणार. चिटनीस नगर मोठा ताजबाग नगर, नागपुर यांची मालकीची ४० वर्ष जुनी दोन साल मशीन आहे. जी ३ वर्षापासुन बंद स्थीतीत होती. सदर मशीनची अंदाजे प्रत्येक किंमत २०,००० रुपये प्रभाणे एकुण ४०,००० रुपये ची सिमेंट काॅन्क्रेटींग चे वरचे माळ्यावरील ज्याला दार नव्हते अश्या खुल्या खोली मधुन दि. १४ में २०२१ च्या पुर्वी कोणी तरी अज्ञात इसमांनी चोरून नेली. सदर प्रकरणी फिर्यादी गं.भा अल्काताई मनोज काकडे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन कन्हान येथे कलम ३८० भादवी अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज