*कामठी खुली कोळसा खदान पोकलँड मशीन मधुन डिझेल चोरी*
*फिर्यादी जंगलु गंगाराम बडोद्रो यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथील पोकलँड मशीन च्या डिझेल टाकीचे झाकन उघडुन अज्ञात चोराने डिझेल चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवार (दि.१७) ला सकाळी ८.३० वाजता दरम्यान वेकोलि कामठी खुली कोळसा खदान चे सुरक्षा रक्षक जंगलु बडोद्रो हे पेट्रोलिंग करित असताना टाटा कंपनीची पोकलँड मशीनच्या डिझेल टाकीचे झाकन उघडुन अज्ञात चोरोने ३० ते ३५ लिटर डिझेल किंमत २८०० रूपयांचे चोरून नेल्याचे दिसुन आल्याने फिर्यादी जंगलु गंगाराम बडोद्रो वय ५९ वर्ष रा. शिवाजी नगर कन्हान वेकोलि सुरक्षा हयानी वरिष्ट अधिका-यांना डिझेल चोरी ची माहीती देऊन कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात इसमा विरूध्द कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास पोहवा. अरूणकुमार सहारे करित आहे.
Maharashtra News Media सच की आवाज