*जोगा( माळेगाव ) येथील माता बाल संगोपन केंद्र कुलूपबंद*

विशेष प्रतिनिधी- विकास दुरुगवार
नंदा गोमुख- तेथून चार किलोमीटर अंतरावरील जोगा येथील माता बाल संगोपन केंद्र गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे .माजी जिल्हा परिषद सदस्य अंजली उईके यांचे हे गाव असून या गावात आदिवासी व गरीब नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात येथे दोन परिचारिका ची नियुक्ती असून राहण्यासाठी कॉटर सुद्धा उपलब्ध आहे परंतु येथे कोणीही राहत नाही परिचारिका महीन्यातून एखाद्या दिवस येते १ ,२ तास काम करून निघून जाते येथील आशा वर्कर व चपराशी सुद्धा ज्या माता बाल संगोपन केंद्र याकडे दुर्लक्ष करतात गोरगरीब पेशंटला कोरोनाच्या काळात विशेषतः गर्भवती महिलांना व छोट्याशा आजारात करतात सावनेर येथे धाव घ्यावी लागते सावनेर ते जोगा अंतर २५ किलोमीटर असून सुद्धा साधन नसतात जिल्हा परिषद सदस्य आमदार व संबंधित अधिकाऱ्यांचे या गावाकडे पूर्णता दुर्लक्ष आहे येथे नवीन परिचारिका ची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे इथील सरपंच्या सुशीला नरेश रामटेके यांची भेट घेतली असता इथे दोन परिचारिकांच नीयुक्ती आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र केळवद तेथे नेहमी यांना बोलावत असल्या कारणामुळे येथे कोणीच राहत नाही असे सरपंच यांनी सांगितले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज