Breaking News

*रबी हंगामातील आनलाईन नोंदनीला 31 मे पर्यंत मुदतवाढ*

*रबी हंगामातील आनलाईन नोंदनीला 31 मे पर्यंत मुदतवाढ*

गोंदिया प्रतिनिधि – शैलेश राजनकर
गोदिया– रबी हंगामातील धान शासकिय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी 30 एप्रील पर्यंत आनलाईन सातबारा नोंदनी करण्याची मुदत होती. पण कोरोणाचा संसर्ग आणि लाॅकडावुन शेतकऱ्यांना सातबारा आनलाईन करता आला नव्हता. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाने बुधवारी धान विक्रीसाठी आनलाईन सातबारा नोंदनीला 31 मे पर्यत मुदतवाढ दिली आहे.

जिल्हात यंदा रबी हंगामात 66 हजार हेक्टर वर रबीची लागवड करण्यात आली होती. शेतकरी रबी धानाची विक्री जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ धान खरेदी केंद्रावर करतात. यंदा रबी हंगामातील धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी या विभागाने सातबार या विभागाच्या संकेतस्थळावर 30 एप्रिल पर्यंत नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना सांगितले होते. मात्र मार्च महिण्यापासुन कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शेतकऱ्यांना सातबारा आनलाईन नोंदनी करता आला नव्हता त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. हिच बाब लक्षात घेत खा. प्रफुल पटेल यांनी चार दिवसापुवरूच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून आनलाईन नोंदनीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवीत मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. बुधवारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने रबी धानाची विक्री शासकीय धान खरेदी केद्रावर करण्यासाठी आनलाईन सातबारा नोंदनीला 31 मे पर्यत मुदतवाढ दिली आहे. गोदिया भंडारा जिल्हातील हजारो षेतकरुयांना दिलासा मिळाला आहे. रबी धान खरेदी करण्यासाठी खा. प्रफुल पटेल व माजी आ. राजेंद्र जैन प्रयत्नरत आहेत.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …