Breaking News

*संयुक्त क्रुती समितीच्या काम बंद आंदोलनाला तांत्रिक अप्रेन्टिस कंत्राटी कामगार असोशीएशनच्या कामगारांचा उत्स्फुर्त प्रतीसाद*

*संयुक्त क्रुती समितीच्या काम बंद आंदोलनाला तांत्रिक अप्रेन्टिस कंत्राटी कामगार असोशीएशनच्या कामगारांचा उत्स्फुर्त प्रतीसाद*

नरखेड तालुका प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नागपूर:- तिन्ही वीज कंपनीत कार्यरत सर अभियंते कर्मचारी तांत्रिक कामगार व कंत्राटी कामगार यांना फ्रंट लाईन वर्कर्स चा दर्जा देण्यात यावा. यांसह विविध प्रलंबित मागण्यासाठी संयुक्त क्रुती समितीने आग्रही भूमिका घेत शासनाने या मागण्या पूर्ण कराव्यात या करिता दि.२४/०५/२०२१ रोजी राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (१०२९) प्रणीत तांत्रिक अप्रेन्टिस कंत्राटी कामगार असोशीएशन राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी सांगितले कामगारांनी काळ्या फिती लावत उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

राज्य सरकारने फ्रंट लाईन वर काम करणारे सर्व अभियंते कर्मचारी तांत्रिक कामगार कंत्राटी कामगार यांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करावे. मेडिक्लेम पॉलिसी TPA संबंधी संघटनांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, कोरोना काळातील परिस्थीती लक्षात ना घेता सक्तीने करण्यात येणारी वीज बिल वसुली थांबविण्यात यावी. यासारख्या विविध मागण्या साठी शासन धोरणाचे निषेधार्थ काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन करण्यात आले.

आंदोलन काळात वीज ग्राहकांना त्रास होणार नाही तसेच दवाखाने वा इतर अत्यावश्यक सेवांचा वीज पुरवठा सुरू राहील याची विशेष खबरदारी आंदोलनकृत्यांकडून घेण्यात आली अशी महिती राज्य उपाध्यक्ष प्रशांत ननोरे व जिल्हा अध्यक्ष विक्की कावळे
यांनी दिली. यावेळी कुणाल जिचकार, सुधाकर काकडे, विजय रेवतकर, निलेश चक्रपाणी, रवि सरोदे, शुभम भोयर उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …