*घुग्घुस कांग्रेस तर्फे भजन मंडळाला तबला पेटीचे वितरण*

*घुग्घुस कांग्रेस तर्फे भजन मंडळाला तबला पेटीचे वितरण*

आवारपूर  प्रतिनिधि :-गौतम धोटे

घुग्घुस येथील अमराई वॉर्ड नं 01 येथे राहणाऱ्या महिला मंडळा तर्फे घुग्घुस परिसरात भजन पठनाचे पवित्र कार्य केल्या जाते.
मात्र त्यांच्याकडे भजन साहित्य उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
भजन मंडळाला होत असलेली अड़चन कामगार नेते सैय्यद अनवर यांनी घुग्घुस कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या लक्षात आणून दिली असता.
राजुरेड्डी यांनी तात्काळ तबला,हार्मोनियम (पेटी)ची व्यवस्था केली व खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या हस्ते भजन मंडळाला तबला पेटी भेट स्वरुपात देण्यात आली*
याप्रसंगी घुग्घुस कांग्रेसचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेता सैय्यद अनवर,अनिरुद्ध आवळे,अजय उपाध्ये, बालकिशन कुळसंगे, शहजाद शेख ,सचिन कोंडावार,अंकुश सपाटे , आरिफ शेख, रंजीत राखुंडे, भजन मंडळी तर्फे डोमाजी वानखेड़े, मालेकर जी,मुर्लिधर जुनारकर,बेबीताई मारेकर, वंदना क्षीरसागर, पार्वता लोने,इलामे ताई व मोठ्या संख्येने यावेळी नागरिकगण उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …