Breaking News

*कोरोनाची तिसरी लाट थोविण्यास जिल्हा प्रशासन सज्य* *गावो गावी जाऊन करत आहेत जन जागृती*

*कोरोनाची तिसरी लाट थोविण्यास जिल्हा प्रशासन सज्य*


*गावो गावी जाऊन करत आहेत जन जागृती*

कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे

कोंढाळी – कोरोना ची पहीली आणि दुसर्या लाटेचा आपण सर्वांनी मुकाबला केला आहे. आता आरोग्य क्षेत्रातील वैज्ञानिकांनी तिसर्या लाटांची शक्यता वर्तवली आहे. पहीली लाट ज्येष्ठाना तर दुसर्या लाटेने तरूणवर्गावर आघात केला आता संभावित तिसरी लाट ही बालकांचे आरोग्याला ईजा पोहचवू शकते , या महामारी ला हलक्यात न घेता आता पासुनच संभावित तिसर्या लाटेला परतवून लावण्या साठी नागपुर जिल्हाप्रशान तयारीला लागले आहे. या करीता नागपूर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचे निर्देशांवरून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधीकारी यांचे संयुक्त जनजागृती मोहिम राबवून कोरोना सह मायक्रोमायसिस यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपुर जिल्हा प्रशानाचेवतीने उपजिल्हाधिकारी शितल देशमुख, काटोल आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा इंडिकेटड अधिकारी व तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार निलेश कदम,राम कृष्ण जंगले, यांचे सह काटोल पंचायत समिती चे सदस्य संजय डांगोरे, तसेच जि प सर्कल मेटपांजरा अंतरगत येणार्या पंचधार, कचारी सावंगा, गणेशपुर, वाई, गरमसुर, सबकुंड, या ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच, सदस्य, ग्राम अधिकारी, आंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ते, कृषी सेवक, रोजगार सेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे सह बैठक करून मायक्रोमायसिस तसेच कोरोना बाबद जनजागृती करत आरोग्य विभागाने व जिल्हा प्रशासनाचे दिलेले निर्देश व नियमावली पालन करने संबधी माहीती दिली, तालुक्यातील ग्रामिण भागातील गावो गावी तिसर्या लाटेला सुद्धा सक्षमपने परतविन्यासाठी आपन तयार राहीले पाहिजे असे पं स सदस्य संजय डांगोरे यांनी सांगीतले तर अधिकारी वर्गाने जिल्हाधीकारी नागपुर यांचे पत्रानुसार काटोल तालुक्यात 28 गट पाडून या माध्यमातून 27मे ते 4जुन 2021या कालावधीत जवळपास 84 गावामधे जाउन कोरोना आणि त्याचे नंतरची उद्भवनारी परीस्थीतीवर नियत्रन ठेवनासाठी प्रशासनाद्वारे गावातील शाळा अथवा ग्राम पंचायत भवन मधे समाजप्रबोधन,क्लीप द्वारे माहीती,देन्यात येत आहे.यामधे जनप्रतीनीधी सोबतच तहसील कार्यालय,पंचायत समीती कार्यालय,क्रुषी कार्यालयाचे अधीकारी सुद्धा उपस्थीत होते.


यावेळी म्युक्रोमायसीस अथवा लसीकरन आदीबाबत आढावा घेन्यात आला. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे तसेच दुसरा डोज सुद्धा घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …