Breaking News

*पंतप्रधान मा.नरेंन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती च्या केंन्द्र सरकार ला ७ वर्ष पुर्ण झाल्याने पारशिवनी तालुक्याचा विविध प्राथमिक आरोग्य केंन्द्रात साहित्य वाटप*

*पंतप्रधान मा.नरेंन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती च्या केंन्द्र सरकार ला ७ वर्ष पुर्ण झाल्याने पारशिवनी तालुक्याचा विविध प्राथमिक आरोग्य केंन्द्रात साहित्य वाटप*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

*पारशिवनी ग्रा. रूग्णालय व प्राथमिक आ. केंद्र वैद्यकीय अधिका-यांना औषधी, साहित्य सुपुर्द*

कन्हान : – पंतप्रधान मा.श्री नरेंन्द्र मोदी च्या नेतृत्वात भाजपा महायुती केंद्र सरकारने ७ वर्ष पुर्ण केल्याचे औचित्य साधुन खासदार मा.श्री विकास महात्मे यांनी आषुष मंत्रालय भारत सरकार द्वारे पारशिवनी ये़थील ग्रामिण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आशा वर्कस यांना औषधी व साहित्य वाटप करण्यात आले.

देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंन्द्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भाजपा महायुतीच्या केंन्द्र सरकार ला ३० मी २०२१ ला ७ वर्षे पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने ‘सेवा हीच संघटना’ हा भाजपाचा मुलमंत्र लक्षात घेऊन पारशिवनी तालुक्यात ‘सेवाकार्य दिन’ या पार्श्वभुमीवर पारशिवनी शहरातील ग्रामिण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंन्द्रास खासदार मा.श्री विकास महात्मे यांनी आढावा घेऊन व रितसर पाहणी करुन आयुष मंत्रालय, भारत सरकार द्वारे ५ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर, ५० पल्स ऑक्सिमिटर, ५० ग्लुको मीटर तसेच केंन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद,(सीसीआरएएस)चे डॉ. श्री. आर गोविंद रेड्डी यांच्या माध्यमातुन स्वास्थ विभाग भारत सरकार मान्य आयुष्य-६४ औषधी ही आरोग्य अधिकारी पारशिवनी तालुका, प्राथमिक आरोग्य केंन्द्र वैद्यकीय अधिकारी आणि आशा वर्कर्स यांना वाटप करण्यात आले . या प्रसंगी खासदार मा.श्री विकास महात्मे, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश वांढे, भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, रामभाऊ दिवटे, अशोक कुथे, सौ.रेखा दुनेदार, अमिश रुंघे, प्रतीक वैद्य, सागर सायरे, राजु भोयर, मनोज गिरी, परसराम राऊत, डॉ.भड, सौरभ पोटभरे सह आदि भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

*कन्हान, साटक व दहेगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रास ऑक्सीजन काॅन्सनट्रेटर वाटप*

कन्हान : – देशाचे पंतप्रधान मा.नरेंन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती केंन्द्र सरकार ने ७ वर्ष पुर्ण केल्याने श्री.श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांचा हस्ते पारशिवनी तालुक्यातील कन्हान, साटक व दहेगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रास ऑक्सीजन काॅन्सनट्रेटर वाटप करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान मा.नरेंन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती च्या केंन्द्र सरकारला ३० मे २०२१ ला ७ वर्षे पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने ‘सेवा हीच संघट ना’ हा भाजपाचा मुलमंत्र लक्षात घेऊन पारशिवनी तालुक्यात ‘सेवाकार्य दिन’ या पार्श्वभुमीवर कन्हान, साटक व दहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्रास श्री श्री फाउंडेशन द्वारे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांच्या हस्ते ऑक्सीजन काॅन्सनट्रेटर वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक, महामंत्री अमिष रूंघे, सुनिल लाडेकर, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, कामेश्वर शर्मा, नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे, नगरसे विका वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, लिलाधर बर्वे, माजी नगरसेवक अजय लोंढे, मनोज कुरडकर, धर्मेंद्र गणवीर, रिंकेश चवरे, शैलेश शेळकी, सौरभ पोटभरे, ऋृषभ बावनकर, संजय रंगारी, आनंद शर्मा, अमन घोडेस्वार, मयुर माटे, सचिन वासनिक, महेश बोंडे, विकास धारपुरे, पराग सपाटे, सागर सायरे, निलेश गाढवे, दिनेश खाडे सह आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

*कामठी येथे भाजपा द्वारे मोदी सरकार ला ७ वर्ष पुर्ण झाल्याने वर्धापन दिवस थाटात साजरा*

कामठी : – देशाचे पंतप्रधान मा.नरेंन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती केंन्द्र सरकार ने ७ वर्ष पुर्ण केल्याने भाजपा कामठी द्वारे माजी मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे महामंत्री श्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांचा हस्ते व सरपंच मंगला कारेमारे यांच्या उपस्थिती मध्ये आशा वर्कर सह गावातील नागरिकांना मास्क व सेनिटाइजर वाटप करुन वर्धापन दिवस थाटात साजरा करण्यात आला .
देशाचे पंतप्रधान मा.नरेंन्द्र मोदीजी यांच्या नेतृत्वा त भाजपा महायुतीच्या केंन्द्र सरकारला ३० मे २०२१ ला ७ वर्षे पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने ‘सेवा हीच संघटना’ हा भाजपाचा मुलमंत्र लक्षात घेऊन कामठी तालुक्यात ‘सेवाकार्य दिन’ या पार्श्वभुमीवर आशा वर्कर सह गावातील नागरिकांना माजी मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे महामंत्री श्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व सरपंच मंगला कारेमोरे यांच्या उपस्थिती मध्ये मास्क व सेनिटाइजर वाटप करुन वर्धापन दिवस थाटात साजरा करण्यात आला .
याप्रसंगी कामठी पंचायत समिति सभापति मा.श्री उमेश रडके, माजी सरपंच मनिष कारेमोरे, माजी उपसभापती बाळु गवते , सह सर्व ग्रामपंचायत सदस्य ,भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …