*अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी आरक्षण संदर्भात मुख्यमंत्र्यांना 500 पत्र*
सावनेर प्रतिनिधि – दिनेश चौरसिया
सावनेर : महाराष्ट्र धनगर समाज महासंघ आणि धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राम गणेश गडकरी महाविद्यालयाच्या सभागृहात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती सोत्साह संपन्न झाली या कार्यक्रमात आरक्षण संदर्भात एक पत्र समाजा साठी एक लक्ष पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्याच्या अभियानाला सुरुवात करून सावनेर तालुक्यातून 500 पत्र पाठविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ नागपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा बाबा टेकाडे होते प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव कसरे,शरद नांदुरकर प्रा विजय टेकाडे आदी होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमेची पूजाअर्चा करून माल्यार्पण केले अध्यक्षीय भाषणात प्रा बाबा टेकाडे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला अन्य मान्यवरांनी सुद्धा आपले विचार प्रगट केले यानंतर समाज भवनासाठी गुरुजी घोडा उड्डाणपुलाचा पासून काही अंतरा वरील पाच हजार स्क्वेअर फुट प्लॉट दान दिल्याबद्दल राजु भक्ते आणि प्रफुल्ल वडे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात एक पत्र समाजासाठी एक लक्ष पत्र मुख्यमंत्र्याला अभियानाची धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेमार्फत अहिल्यादेवी जयंती पासून सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम अहिल्यादेवीच्या जयंती ते पुण्यतिथी या काळात निर्धार आहे हा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करून करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू भक्ते यांनी केले तर प्रफुल्ल भक्ते यांनी आभार मानले प्रसंगी प्रा बाबा टेकाडे पंजाबराव कसरे शरद नांदुरकर दौलत डहाके राजू भक्ते महादेव खरबडे चंद्रकांत टेकाडे ज्ञानेश्वर भक्ते अनिल टेकाडे गणेश डहाके चंदू टेकाडे कोमल भक्ते हिरालाल आगरकर शिवम भक्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज