Breaking News

*भर दिवसा जयंत सुरेश पाटील यांचे बॅगेतील २० हजार रूपये चोरून आरोपी पसार* *फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

*भर दिवसा जयंत सुरेश पाटील यांचे बॅगेतील २० हजार रूपये चोरून आरोपी पसार*

*फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जे.एन.राष्ट्रीय महामार्गावर वाघोली शिवारात पेट्रोल पंप वरून मित्राने दिलेले वीस हजार रूपये बँग मध्ये ठेवुन पाठीमागे बँग लटकावुन दुचाकीने जात असतांना अनओळखी तिन इसमाने येऊन पारशिवनी ला कोणता रस्ता जातो असे विचारपुस करतांना बँग हिसकावुन बँग मधिल वीस हजार रूपये घेऊन पसार झाले . भर दिवसा ही घटना घडल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अनओळखी तिन इसम विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक .३१ मे ला अनओळखी तिन इसम दुपारी २ वाजता च्या सुमारास जयंत सुरज पाटील वय २६ वर्ष राहणार.गोंडेगाव हा आपल्या पेट्रोल पंप वरून त्यांचे मित्राने दिलेले वीस हजार रूपये आपल्या बँग मध्ये ठेवुन बँग पाठीमागे लटकावुन आपल्या घरी मोटार सायकलने जात असतांना नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ चारपदरी रसत्या वरील पंजाबी धाबा समोर वाघोली शिवारात जवळ जात असतांना एका एक्टिव्हा दुचाकी वरून ३ अनओळखी इसम अंदाजे वय २५ ते ३० वर्ष वयोगटातील इसमाने पारशिवनी गाव कुठे आहे व रस्त्याबाबत विचारपुस केली असता पाठीमागे लटकावुन ठेवलेल्या बँगेची चैन फिर्यादीची नजर चुकवुन त्यात ठेवलेले वीस हजार रूपये चोरी करून प़ळुन गेले. कन्हान पोलीसांनी फिर्यादी जयंत पाटील यांचा तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोहवा खुशाल रामटेके आरोपीचा शो़ध करित आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …