*टेकाडी कॉलोनी येथुन होंडा दुचाकी चोरी*
*फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी काॅलनी येथील दिपक कलवल यांने आपली दुचाकी वाहन रुम समोर ठेवलेली होंडा मोपेड काळ्या रंगाची दुचाकी अज्ञात आरोपी ने चोरुन नेल्याने फिर्यादी दिपक कलवल यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.३०) मे २०२१ ला सकाळी ८ ते ८:३० च्या सुमारास दिपक दर्शन कलवल वय ३० वर्ष रा. टेकाडी काॅलोनी, कन्हान याने आपली होंन्डा मोपेड क्रमांक एम एच ३४ ए जे ५६४२ काळ्या रंगाची किंमत २०००० रुपये ही त्याने घरा समोर ठेवली असता दुसर्या दिवशी दिपक कलवल कामावर जाण्याकरिता घरुन निघाला असता त्याने ठेवलेल्या जागी मोपेड होंन्डा दिसुन आली नाही. शोध घेतला असता मिळुन न आल्याने फिर्यादी दिपक कलवल यांचा तक्रारीवरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक १५८/२०२१ कलम ३७९ भांदवि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला . सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोहवा खुशाल रामटेके पुढील तपास करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज