*नगरधन ,भंडारबोंडी , हीवरा बाजार व मनसर येथे प्राथमिक आरोग्य केंन्द्रास ऑक्सीजन काॅन्सनट्रेटर वाटप*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
रामटेक : – देशाचे पंतप्रधान मा.नरेंन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती केंन्द्र सरकार ने ७ वर्ष पुर्ण केल्याने श्री.श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांचा हस्ते रामटेक तालुक्यातील नगरधन , भंडारबोंडी , हीवरा बाजार व मनसर प्राथमिक आरोग्य केंन्द्रास ऑक्सीजन काॅन्सनट्रेटर वाटप करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान मा.नरेंन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती च्या केंन्द्र सरकारला ३० मे २०२१ ला ७ वर्षे पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने ‘सेवा हीच संघटना’ हा भाजपाचा मुलमंत्र लक्षात घेऊन रामटेक तालुक्यात ‘सेवाकार्य दिन’ या पार्श्वभुमीवर
नगरधन , भंडारबोंडी , हीवरा बाजार व मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्रास श्री श्री फाउंडेशन द्वारे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांच्या हस्ते ऑक्सीजन काॅन्सनट्रेटर वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा उपाध्यक्ष नरेश पोटभरे , ग्रामविकास आघाड़ी ग्रामीण नागपुर जिल्हा अध्यक्ष राजेश ठाकरे , भाजपा रामटेक तालुका अध्यक्ष नरेंद्र बंनाटे , भाजपा नागपुर जिल्हा महामंत्री राहुल किरपान , भाजपा अनु: सुचित जाती मोर्चा जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे , भाजपा रामटेक तालुका महामंत्री राजु जैस्वाल , जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे , भाजपा युवा मोर्चा रामटेक तालुका अध्यक्ष नंदकिशोर चंदनखेडे , भाजपा अनु : सुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे , भाजपा पारशिवनी तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळकी , ज्ञानेश्वर ढोक , धर्मेंद्र शुक्ला , नंदु कोहळे , मयुर माटे , सचिन वासनिक , प्रवीण मस्के सह आदि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Maharashtra News Media सच की आवाज