Breaking News

*कोंढाळी येथील बाल कोविड केंद्राची उपजिल्हाधिकार्यांकडून पाहणी* *गावो-गावी जाऊन कोविड 19-,म्युकरमायकोसिस व बालकोविड बाबद जनजागृती*

*कोंढाळी येथील बाल कोविड केंद्राची उपजिल्हाधिकार्यांकडून पाहणी*


*गावो-गावी जाऊन कोविड 19-,म्युकरमायकोसिस व बालकोविड बाबद जनजागृती*

कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी  – शुक्रवार ०४जून रोजी नागपुर च्या उपजिल्हाधिकारी (एडीएम) शितल देशमुख यांनी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्र पोहचून बालकोविड केंद्र सुरू करण्याच्या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधी व आरोग्य अधिकारी यांच्यासह बाल कोविड सेंटर सुरू करण्या बाबद प्राथमिक आरोग्य केंद्र व अपुर्ण बांधकाम असलेल्या ग्रामिण रूग्णालयाची पाहणी केली.

कोविडच्या तिसर्‍या लाटेमुळे मुलांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी कोंढाळी सरपंच केशवराव धुर्वे व उपसरपंच स्वप्निल व्यास आणि कोंढाळी ग्रा प सदस्यांद्वारे
कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीमुळे.म्युकरमायकोसिस व कोविड जनजागृती करिता दौर्यावर असलेल्या नागपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी शितल देशमुख, कोंढाळी जिल्हा सदस्या पुष्पाताई चफले, पं स सदस्य लता धारपुरे, अरुण उईके व तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार राम कृष्ण जंगले, ग्रा प सदस्य प्रमोद चाफले यांनी ग्रामिण भागीतील धोतीवाडा कामठी, मासोद दुधाळा, सह अन्य ग्रा प मधे जनजागृती नंतर कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पोहचले आणि बाल कोविड केअर सेंटरला लागनार्या सर्व व्यवस्थेची माहिती केली. या पाहणी दरम्यान कोंढाळी प्रा आ केंद्र आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री वाळके यांनी माहिती दिली की कोंढाली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत महिलांच्या प्रसूती व कुटुंब कल्याणसाठी बनविलेल्या खोलीत बाल कोविड सेंटर योग्य होणार नाही, तसेच कोंढाळी येथील निर्माणाधीन ग्रामीण रूग्णालयाची फ्लोअरिंग, विद्युतीकरण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे.तसेच कोंढाळी जि.प. सर्कल अंतर्गत बाल कोविड सेंटरसाठी तीन आरोग्य अधिकारी, तीन एनएमएस, तीन सफाई कामगार आणि ऑक्सिजन काॅनंस्ट्रेटर, ई सी जी इत्यादी उपकरणे पुरविल्या गेल्यास बालकोविड सेंटर होऊ शकते. या करिता कोंढाळी जि.प. सर्कल अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृहाची, प्राथमिक दुरुस्ती केली तर बाल कोविड सेंटर बनविली जाऊ शकते. यासाठी जिल्हा अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, सोबतच कोंढाळी-मेटपंजरा जिल्हापरिषद, पंचायत समिती सदस्य व कोंढाळी ग्रा प यांच्या संयुक्त प्रयत्नांच्या व इच्छेच्या आधारे बालकोविड सेंटर होऊ शकते.

येथील ग्रामिण रूग्णालयाचे व प्रा आ केंद्राचे पाहणी दरम्यान उपजिल्हा धिकारी शितल देशमुख ,जि प सदस्य पुष्पा ताई चाफले पं स सदस्य लता धारपुरे, ग्रा प सदस्य प्रमोद चाफले सह डाक्टर जयश्री वाळके, डा अश्विनी दातीर
उपस्थित होते

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …