Breaking News

*मस्जिद जवळच्या नाल्याची साफ सफाई करुन किटकनाशकाची फवारणी करण्याची मागणी* *कन्हान शहर विकास मंच चे न.प मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*

*मस्जिद जवळच्या नाल्याची साफ सफाई करुन किटकनाशकाची फवारणी करण्याची मागणी*

*कन्हान शहर विकास मंच चे न.प मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत वार्ड क्रमांक. सात पटेल नगर येथील मस्जिद जवळच्या नाल्याची साफ सफाई गेल्या अनेक वर्षापासुन न झाल्याने परिसरात दुर्गंधीने नागरिकांना विविध प्रकारच्या घातक आजार होत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी मंच सदस्य शाहरुख खान यांच्या नेतृत्वात न प मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करून मस्जिद जवळ असलेल्या नाल्याची साफ सफाई करून किटकनाशकांची फवारणी करण्याची मागणी केली आहे.
कन्हान-पिपरी शहरातील वार्ड क्रमांक सात पटेल नगर येथे मस्जिद जवळ असलेल्या नाल्याची साफ सफाई गेल्या अनेक वर्षापासुन न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना टाईफाईड, डेंगु, मलेरिया, निमोनिया सारख्या अनेक विविध प्रकारच्या घातक आजार होत असुन मच्छरांचा सुद्धा प्रकोप वाढला आहे. अगोदर संपुर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात कोरोनाचे थैमान चांगलेच पसरल्याने कितीतरी लोकांचा मृत्यु झाल्याने नागरिकांत मध्ये भीतीचे वातावरण असुन पटेल नगर येथील नागरिकांना अस्वच्छतेने दुर्गंधी गंदगीचा सामना करावा लागत आहे.

कन्हान- पिपरी शहरातुन कोरोना सह विविध प्रकारच्या आजारांना हद्दपार करण्याकरिता नगरपरिषद प्रशासना द्वारे शहरात नियमित साफ सफाई करून किटकनाशक औषधाची फवारणी करणे अत्यंत गरजेचे झाले असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी मंच सदस्य शाहरुख खान यांच्या नेतृत्वात न प मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांच्याशी या गंभीर समस्येशी चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करून मस्जिद जवळच्या नाल्याची साफ सफाई करुन किटकनाशक औषधाची फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ॠषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, सदस्य प्रविण माने, सुषमा मस्के सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …