*पक्षी जलयंत्र व वु्क्ष वाटप*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
नागपुरः जागतीक पर्यावरण दिनानिमित्त वरिष्ठ योग शिक्षक स्व. गाढगे सर यांच्या सच्चिदानंद नगर येथील निवास स्थानी पक्षीजल यंत्र आणी झाडाचे रोपटे यांचे वाटप करून हा दिवस साजरा करण्यात आला. गाढवे सरांची मुलगी डॉ. पल्लवी लुटे यांनी हे यंत्र घरी तयार केलेत. स्व. गाढवे सर आणि कविता ताई गाढगे यांच्या लग्नाचा वाढदिवस व जागतिक पर्यावरण दिन याचे औचित्य साधुन हा उपक्रम राबविण्यात आला.

*समाजसेवक व योग कार्यात आपले संपूर्ण जिवन वेचनारे स्व. गाढवे सरांना मागील महिन्यात देवाज्ञा झाली त्यावेळी दुसर्या चरणाच्या कोरानापासुन सावधगिरी व कडक लाँकडाऊन मुळे कुणीही आपल्या लाडल्या योगगुरूचे अंतिम दर्शन व त्यांच्या परिवारास सहवेदना व्यक्त करु शकला नाही सद्यास्थितीत कोरोना विषाणूंचा प्रकोप कमी असल्यामुळे पतंजलि परिवारातर्फे स्व.गढवे सरांना आदरांजली म्हणून वाहण्यात आली याप्रसंगी पतंजली योग समितीचे सहप्रभारी कमलजी गुप्ता,महिला महामंत्री माधुरी निंबुरकर,मीडिया प्रभारी ज्योत्स्ना इंगळे,किरण डांगरे, वनिता सेलोकर,वैद्य काका इ.उपस्थित होते. पर्यावरणाविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन डॉक्टर पल्लवी लुटे यांनी केले त्यांनी म्हटले की पर्यावरणा विषयी आपलीही काही जबाबदारी असते.पर्यावरण आपल्याला निशुल्क सर्वकाही देतो तर त्याबदल्यात आपणही त्याला काहीतरी दिले पाहिजे. झाडे लावून त्या झाडाची जबाबदारी आपण प्रत्येकाने जर घेतली तर वातावरण अतिशय शुद्ध राहील आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.झाडे लावा झाडे जगवा हा मुलमंत्र त्यांनी यावेळी दिला.*
Maharashtra News Media सच की आवाज